सांगोला – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करण्याची क्षमता विकसित करावी, या उद्देशाने फॅबटेक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची संगत, त्यांचे वर्तन आणि शैक्षणिक प्रगती याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असे मत सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर यांनी व्यक्त केले. ते प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांचा पालक मेळाव्यात बोलत होते. मेळाव्याची सुरुवात भाऊसाहेब रूपनर, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डॉ.विद्याराणी क्षीरसागर, स्टुडंट डीन डॉ.संजय पवार, पालक प्रतिनिधी आबासाहेब कोष्टी, सीमा दिवसे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.ज्योती शिंदे यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रा.ज्योती शिंदे यांनी विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला डॉ.रविंद्र शेंडगे, डॉ.विद्याराणी क्षीरसागर, डॉ.संजय पवार, प्रा.माधुरी सुरवसे यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. आबासाहेब कोष्टी, सीमा दिवसे यांच्यासह अनेक पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे, प्रा.सत्यशील कोळेकर तर आभार प्रदर्शन प्रा.भारती गायकवाड यांनी केले.
Views: 10