श्रीपूर – श्रीपूर येथिल प्रथमेश रमेश लोंढे यांची भारतीय जनता पार्टीच्या माढा पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय जनता पार्टी माढा पश्चिम मंडल अध्यक्षा सौ सुरजा योगेश बोबडे यांनी सदर निवड केली यावेळी सुरजा बोबडे यांनी भारतीय जनता पार्टी अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन आगामी काळामध्ये जनसामान्यांच्या मध्ये जाऊन सर्वांना सोबत घेऊन पक्ष वाढीसाठी व संघटनात्मक बांधणीसाठी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे .
प्रथमेश रमेश लोंढे महामानव प्रतिष्ठान चे ते संस्थापक आहेत महामानव प्रतिष्ठान चे वतीने राष्ट्र पुरुषांच्या जयंती तसेच रक्तदान शिबीर, वृक्षारोपण , जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना अल्पोपहार , चहा पाणी वाटप हे कार्यक्रम घेतात . भारतीय जनता पार्टी माढा पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष पदी प्रथमेश लोंढे यांच्या निवडिचे श्रीपूर – महाळुंग परिसरातील स्वागत होत आहे.
निवडी नंतर या भागात भारतीय जनता पार्टी चे काम वाढवून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले .
Views: 11