Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; २१६ गावांना टँकरचा आधार!

तरुण भारतbyतरुण भारत
November 29, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गंभीर बनत असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याची स्थिती, टँकरची आवश्यकता, बंद पडलेल्या हातपंपांची संख्या आणि आगामी काळातील टंचाई निवारणासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आढावा घेतला असता पाण्याचा प्रश्न किती व्यापक बनला आहे, याचे चित्र समोर आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील २१६ गावे आणि १ हजार २१४ वाड्या-वस्त्यांना पाणीटंचाईची बाधा झाली असून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल २८० टँकर सुरू करण्यात आले आहेत. या टँकरच्या माध्यमातून सुमारे ५ लाख ४ हजार ५५० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे, आगामी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सुमारे ९०६७.३४३ लाखांचा टंचाई आराखडा तयार केला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सन २०२६-२७ मधील हातपंप देखभाल व दुरुस्तीच्या अहवालानुसार, सोलापूर जिल्ह्यात एकूण १२ हजार ३५६ हातपंप आहेत. त्यापैकी १० हजार ८६२ हातपंप कार्यान्वित असून, १ हजार ४९४ हातपंप कायमस्वरूपी बंद असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
एप्रिल २०२६ पासून अहवाल तयार करण्याच्या कालावधीपर्यंत एकूण ३ हजार ६९९ हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली आहे. हातपंप दुरुस्ती आणि देखभालीसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, तालुकास्तरावर एकूण १४ फिरते पथक व वाहने उपलब्ध असल्याची नोंद अहवालात आहे. बंद पडलेले हातपंप वेळेत दुरुस्त होणे आणि कार्यरत हातपंपांची नियमित देखभाल होणे, ही ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेसमोरील महत्त्वाची गरज बनली आहे.
२७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या टँकर व अधिग्रहण सद्यस्थिती अहवालानुसार, जिल्ह्यातील २१६ गावे पाणीटंचाईग्रस्त आहेत. या गावांमधील १ हजार २१४ वाड्या-वस्त्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी एकूण २८० टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये २८० खासगी टँकरचा समावेश असून, शासकीय टँकरची संख्या शून्य असल्याचे अहवालात नमूद आहे.या टँकरच्या माध्यमातून तब्बल ५ लाख ४ हजार ५५० नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची संख्या आणि लाभार्थ्यांची व्याप्ती पाहता ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे गांभीर्य अधोरेखित होते.
फिडींग पॉइंटची दुरुस्ती, नवीन फिलिंग पॉइंटची कामे, हातपंपांची देखभाल आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांची निधीची मागणी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून करण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद आहे. एकीकडे जिल्ह्यातील २१६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे, तर दुसरीकडे सुमारे दीड हजार हातपंप बंद असल्याची स्थिती आहे. कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनांसाठी ४८ कोटींहून अधिक निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचवेळी संभाव्य टंचाई निवारणासाठी २०६ कोटींचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे केवळ टँकरच्या माध्यमातून तात्पुरती तहान भागविण्यापेक्षा ग्रामीण भागातील पाण्याचे स्रोत बळकट करणे, बंद हातपंपांची दुरुस्ती करणे, प्रलंबित पाणीपुरवठा योजना मार्गी लावणे आणि प्रस्तावित उपाययोजनांना वेळेत निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न केवळ कागदावरील आकडेवारीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्षात सुटणार का, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.
चौकट
६९ गावांसाठी ४८ कोटींच्या पाणी योजनांची मागणी
पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ६९ गावांसाठी ६९ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या योजनांसाठी एकूण ४ हजार ८५८.७६ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच सुमारे ४८ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे.
चौकट
तालुकानिहाय टँकरची स्थिती
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात सर्वाधिक ८५ टँकर सुरू आहेत. त्याखालोखाल मंगळवेढा तालुक्यात ६८ टँकर, माढा तालुक्यात २४, मोहोळ तालुक्यात १८, अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यात प्रत्येकी १६, माळशिरस आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रत्येकी ११, बार्शी तालुक्यात ८, करमाळा तालुक्यात १६, तर पंढरपूर तालुक्यात एका टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असल्याची तालुकानिहाय नोंद आहे. एकूण टँकरची संख्या २८० असल्याचे विभागाच्या संक्षिप्त अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकट
६८ फिडिंग पॉइंट, २८० टँकर भरण्याची व्यवस्था
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या फिडींग पॉइंटविषयक माहितीनुसार, जिल्ह्यात सध्या ७३ फिलिंग पॉइंट कार्यरत आहेत. टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी २८० टँकर भरणा टाक्यांची नोंद करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या फिलिंग पॉइंटच्या संख्येत भविष्यात वाढ करण्याचे नियोजनही विभागाने केले आहे. टँकरची संख्या वाढल्यास अथवा नव्या भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्यास पाणी भरण्याची व्यवस्था सक्षम असणे आवश्यक ठरणार आहे.
Views: 11
Previous Post

महिलांच्या क्रिकेट सहभागासाठी टेंभुर्णीत स्वतंत्र स्पर्धा भरवा; सोनिया गोरे यांचे आवाहन

Next Post

भूजल पातळीत ०.३३ मीटरने घट सोलापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गंभीर !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भूजल पातळीत ०.३३ मीटरने घट सोलापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गंभीर !

ताज्या बातम्या

दोन दुचाकींची धडक; एक ठार

November 29, 2026
९० किलोमीटर पाठलाग करुन ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघड

९० किलोमीटर पाठलाग करुन ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघड

November 29, 2026

कार्तिकी यात्रा सांगता समारंभानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ५ हजार किलो रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

November 29, 2026

भूजल पातळीत ०.३३ मीटरने घट सोलापूर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट गंभीर !

November 29, 2026

सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद; २१६ गावांना टँकरचा आधार!

November 29, 2026

महिलांच्या क्रिकेट सहभागासाठी टेंभुर्णीत स्वतंत्र स्पर्धा भरवा; सोनिया गोरे यांचे आवाहन

November 29, 2026
भाजपा माढा पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी प्रथमेश लोंढे यांची निवड

भाजपा माढा पश्चिम मंडल अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्षपदी प्रथमेश लोंढे यांची निवड

November 29, 2026

एमपीएससी अर्जासाठी दोन दिवसांची मुदतवाढ; विद्यार्थ्यांच्या मागणीला यश!

November 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1580148

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!