माझ्या जीवितास कसायांपासुन असणारा धोका पाहता महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने 24 तास पोलिस संरक्षण देऊ केले आहे…त्यामुळे माझ्या घरी माझ्या सोबत 24 तास पोलिस अंगरक्षक असतात व माझ्या गोरक्षक सहकार्यांची ये जा असते…मी वर्तमानात राहत असलेले घर हे भाडेतत्त्वावर असुन सदर घर मालकांनी मला ह्या दुसर्या कुणाच्या जीवितास हानी होईल या कारणापोटी घर खाली करावयास सांगितले…दर एक – दोन वर्षांनी असेच कारण देऊन नेहमी घर खाली करण्यास सांगतात. मी गेली 3-4 महिने घर शोधत असुन मला दुसर्या ठिकाणी घरही उपलब्ध होत नाही…नकार देताना नवीन घरमालकाचे कान भरून गोरक्षणाचे काम किती धोकादायक आहे व तुमच्या जिवाला धोका आहे…उद्या काही झाले तर तुमच्यामुळे सोसायटीच्या लोकांना त्रास होईल. तसेच तुमच्या सोबत नेहमी पोलिस असतात असेही कारण प्रामुख्याने देताना मी पाहिलंय…आज माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे असा की मी गोरक्षणाचे काम करुन स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला विस्थापित तर करून घेत नाहीये ना..?…ह्या प्रश्नाचे उत्तर अजूनही माझ्या मनात अनुत्तरीतच आहे…आणि मी गोरक्षण का करतोय , कशासाठी करतोय..?…माझी कुणाकडून काहीही अपेक्षा नाही पण आपला समाज किती असंवेदनशील झाला आहे हे ह्याची जाणीव करून देण्यासाठी आपल्या सर्वांसमोर हा सगळा विषय मांडत आहे..!
आपला नम्र
शिवशंकर स्वामी
Post Views: 92