तेरा वर्षांपासून पगार न मिळाल्याने मार्डी येथील हणुमंत काळे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अनुकंपावर पत्नीला नोकरीस घ्यावे, दोषींवर कारवाई करावी, थकित वेतन द्यावे या नातेवाईकांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्या. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नातेवाईकांच्या मागणी लक्षात घेत तीन जणांची समिती नेमली. यात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मारुती फडके, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, तृप्ती अंधारे यांचा समावेश होता. त्यांनी सर्व माहिती घेत रात्री पाऊणे एक वाजता नातेवाईकांना पत्र दिले. पत्र घेतल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे मान्य केले. नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेतला. नरोटेवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...