Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत मिळणार विमासंरक्षण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 20, 2023
in maharashtra, sports
0
राज्यातील ५० हजार गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत मिळणार विमासंरक्षण
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील ५० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे.

दरम्यान राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे आभार मानले आहेत.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात दहीहंडी उत्सव तसेच प्रो-गोविंदा लीग स्पर्धा भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येते. या उत्सव आणि स्पर्धेत हजारो गोविंदा आणि गोपिका सहभागी होत असतात. दहिहंडी हा साहसी खेळ असल्याने तो खेळताना गोविंदांना अपघात होतात, रुग्णालयात दाखल करुन वैद्यकीय उपचारांची गरज पडते. प्रसंगी गोविंदांचा मृत्यूही ओढवतो. अशा परिस्थितीत गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. यंदाही मुंबई, ठाण्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ११ जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेऊन गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर अवघ्या सव्वा महिन्याच्या आतच कार्यवाही पूर्ण झाली आणि १८ ऑगस्ट रोजी गोविंदा पथकांना विमा संरक्षण देण्याचा शासननिर्णय, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील क्रीडा विभागाने जारी केला.

या शासननिर्णयामुळे, दुर्दैवाने एखाद्या गोविंदाचा खेळताना अपघाती मृत्यू झाला किंवा त्याचा दोन अवयव किंवा दोन्ही डोळे गमवावे लागले तर, त्याच्या कुटुंबियांना किंवा त्याला १० लाखांची मदत मिळणार आहे. एक हात, एक पाय किंवा एक डोळा गमावल्यास ५ लाखांची मदत मिळणार आहे. कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास १० लाखांची मदत मिळणार आहे. अंशत: अपंगत्व आल्यास निश्चित केलेल्या टक्केवारीनुसार मदत मिळणार आहे. गोविंदांचा १ लाख रुपयांपर्यंतचा रुग्णालयातील उपचारांचा खर्चही विमा संरक्षणातून केला जाणार आहे. सदर विमा संरक्षणाचा लाभ राज्यातील ५० हजार गोविंदांना होणार असून, त्यासाठी लागणारा प्रत्येकी ७५ रुपयांप्रमाणे ३७ लाख ५० हजार रुपयांचा विमा हप्ता महाराष्ट्र राज्य दहिहंडी समन्वय समितीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. समितीला तशी परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात दहिहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. गोविंदा मंडळातील तरुण महिनाभर आधीपासून मानवी मनोऱ्यांचा सराव करत असतात. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा विचारात घेऊन गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा आणि त्यासंदर्भातील सुरक्षिततेची नियमावली तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहिहंडी पथकांना विमासंरक्षण मिळावे, आयोजनावरील जाचक अटी शिथील कराव्यात, गोविंदा उत्सवाची वेळ मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाढवावी, दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, गोविंदा पथक व आयोजकांवर याआधी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्या गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी आणि चर्चेदरम्यान केल्या होत्या. त्यापैकी विमा संरक्षणाची पहिली आणि महत्वाची मागणी मान्य झाली आहे. उर्वरीत मागण्याही मान्य होतील, असा विश्वास गोविंदा पथकांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री यांची भेट घेतलेल्या, तसेच विमासंरक्षण दिल्याबद्दल आभार मानलेल्यांमध्ये, ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आणि गोविंदा पथकांचे प्रमुख पदाधिकारी अरुण पाटील (प्रमुख प्रशिक्षक, माझगाव ताडवाडी गोविंदा पथक), कमलेश भोईर (अध्यक्ष, यंग उमरखाडी गोविंदा पथक), संदीप ढवळे (प्रमुख प्रशिक्षक, जय जवान गोविंदा पथक), समीर पेंढारे (सल्लागार, सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव खोपट ठाणे), निलेश वैती (अध्यक्ष, जतन गोविंदा पथक), रोहिदास मुंडे, (अध्यक्ष, एकविरा आई गोविंदा पथक दिवा), नितीन पाटील (सल्लागार, आई चिखलादेवी गोविंदा पथक-कोपरी), अजित यादव (प्रशिक्षक, बेस्टचा राजा गोविंदा पथक-परेल), संदीप पाटील (अष्टविनायक गोविंदा पथक), किरण जमखंडिकर (धारावीकर आर्यन ग्रुप), अतुल माने (गावदेवी गोविंदा पथक, नालासोपारा), विवेक कोचरेकर (कोकणनगर गोविंदा पथक), आप्पा जाधव (संस्कृती गोविंदा पथक) आदींसह अनेक गोविंदांचा समावेश आहे.

Post Views: 85
Previous Post

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठकीचे आयोजन

Next Post

जुनी पेन्शन योजना समितीला अहवालासाठी मुहूर्त मिळेना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
जुनी पेन्शन योजना समितीला अहवालासाठी मुहूर्त मिळेना

जुनी पेन्शन योजना समितीला अहवालासाठी मुहूर्त मिळेना

ताज्या बातम्या

आता शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमुक्ती

June 3, 2026

सात मिनिटांचा व्हिडिओ बनवत सगळे संपवले

June 3, 2026

अखेर गोपाळगड झाला मोकळा #marathinews #news

June 3, 2026

नागेश भोसलेंची सही बनावट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

June 3, 2026

विवाहितेस माहेरी दिले हाकलून; वाचमेनला अज्ञातांकडून मारहाण

June 3, 2026

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

June 3, 2026
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

June 3, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0891629

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697