Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगलीहून मुंबईला जाणाऱ्या बसला साताऱ्यात आग,चालकाला वेळीच माहिती मिळाली अन् अनर्थ टळला, ४० जण थोडक्यात बचावले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 7, 2023
in maharashtra
0
सांगलीहून मुंबईला जाणाऱ्या बसला साताऱ्यात आग,चालकाला वेळीच माहिती मिळाली अन् अनर्थ टळला, ४० जण थोडक्यात बचावले
0
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा जिल्ह्यातील तासवडे टोलनाक्यावर सांगलीतील मिरजहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. इतर वाहनचालकांनी बस चालकाला वेळीच सतर्क केल्यानं अनर्थ टळला.

 

 

कराड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्स अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. तासवडे टोलनाका (ता. कराड) येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसमधून ४० प्रवाशी हज यात्रेला जाण्यासाठी निघाले होते. या घटनेमुळे टोलनाका परिसरात प्रवाशांसह वाहनधारकांची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही

 

 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डॉल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (एमएच ०३-सीपी- ४५०० ) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी कराड येथे ट्रॅव्हल्सचा टायर पंक्चर झाल्याने तिथे थांबली होती. तेथून ती पहाटे पुढे निघाली होती. काही अंतरावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांनी बसचालकास दिली. आग लागल्याचे लक्षात येताच बस बाजूला घेऊन संबंधित चालक व पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं.

 

 

तेथील उपस्थितांनी आगीची माहिती कराड नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशामक दलाने अवघ्या पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टाळली. यावेळी तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश भोसले, प्रविण गायकवाड, होमगार्ड खडके, आकाश माने घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेची माहिती तळबीड पोलिस घेत आहेत. सुदैवाने, या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा खासगी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती हज यात्रेला निघालेल्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन यात्रेकरूंना पुढील प्रवासासाठी सोय करून दिली.

Post Views: 130
Previous Post

एक निर्णय आणि धडाम झाले शेअर, तुमच्या ‘खिशातल्या’ कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे कारण?

Next Post

राज्यभरातून ५०० बैलगाडा सहभागी, माळशिरसच्या गारवाड येथे बैलगाडा शर्यतीचा थरार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यभरातून ५०० बैलगाडा सहभागी, माळशिरसच्या गारवाड येथे बैलगाडा शर्यतीचा थरार

राज्यभरातून ५०० बैलगाडा सहभागी, माळशिरसच्या गारवाड येथे बैलगाडा शर्यतीचा थरार

ताज्या बातम्या

गर्भवती महिलेच्या तक्रारीवरून उपमहापौर देवकर यांनी केली पाहणी

May 10, 2026

सोलापूर तुळजापूर रस्त्यावर अपघात झाला

May 10, 2026

थलपतीच्या शपथविधीला अभिनेत्री त्रिशाची हजेरी #viral

May 10, 2026

शेतीच्या वादातून चक्क बापावर केला चाकूने हल्ला

May 10, 2026

विजेची तार अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू

May 10, 2026

कुत्रा मध्ये आल्याने रिक्षा उलटली चालकाचा मृत्यू

May 10, 2026

दृष्टीहिन रक्षिताला आईने दिली कष्टाने नवीन सृष्टी

May 10, 2026

मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये डोक्यात खुपसलेला कोयता घेऊनच तरुण उपचारासाठी दाखल झाला होता #viral

May 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0857090

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697