Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in mumbai
0
दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या जागांचा एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

मुंबई : दि चिल्ड्रेन एड सोसायटीच्या मुंबई शहरात असलेल्या जागांवर असलेली अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. अतिक्रमण मुक्तीनंतर जागांचे संरक्षण करून त्यावर एकत्रित पुनर्विकास आराखडा राबवावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सोसायटीच्या नियामक मंडळ बैठकीत दिले.  सोसायटीचा शताब्दी महोत्सव हा पुनर्विकसित जागेत साजरा झाला पाहिजे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीला महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे , महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. बैठकीत सोसायटीमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जोडारी (वेल्डिंग) प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला यावेळी मान्यता देण्यात आली.

दि चिल्ड्रेन एड सोसायटीला शासकीय म्हणून मान्यता देण्याचा सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, असा प्रस्ताव सादर झाल्यानंतर विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून प्रस्तावाची पडताळणी करण्यात यावी. सुधारित आकृतीबंध तयार करण्यात यावा. या आकृतीबंधामध्ये संपूर्ण पदांचे अवलोकन करावे. बालकांचे संरक्षण, त्यांची सुधारणा, शिक्षण आदी बाबी विचारात घेऊन पदांची निर्मिती असावी. सोसायटीमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला परीक्षा केंद्र म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव तातडीने कौशल्य विकास विभागाकडे सादर करावा. कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून परीक्षा केंद्राला मान्यता देण्यात येईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माटुंगा येथील डेव्हिड ससून औद्योगिक शाळेच्या परिसरात कर्मचारी वसाहत इमारतीच्या जागेवर महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयांसाठी एकत्रित संकुल असलेले ‘अहिल्या भवन’ उभारण्यात यावे. सोसायटीच्या बोर्ला येथील जमिनीवर २०११ पूर्वीचे अतिक्रमणधारक असल्यास त्यांना सोडून अन्य जागा अतिक्रमण मुक्त करण्यात यावी. अतिक्रमण मुक्त केल्यानंतर पुनर्विकास वेगाने पूर्ण करण्यात यावा.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ येथील शासकीय कार्यालयास अतिक्रमण काढल्यानंतर त्या ठिकाणी सदर कार्यालयाला जागा देण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मानखुर्द येथील जागेवर असलेले क्रीडा संकुल अतिक्रमणमुक्त करण्यात येणाऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.

मानखुर्द येथे ए.पी.जे अब्दुल कलाम दिव्यांग मुलांचे बालगृह आहे. या बालगृहाची इमारत सर्व सुविधांनीयुक्त सुसज्ज करण्यात यावी. बाल कल्याण नगरी, मानखुर्द येथील आकृतीबंधाचाही एकत्रित सुधारित आकृतीबंधमध्ये समावेश करून प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी सादरीकरण केले. याप्रसंगी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, दि चिल्ड्रेन एड सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद तळसकर, मुख्य अधिकारी प्रवीण भावसार आदी उपस्थित होते.

Post Views: 36
Previous Post

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाला राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाकडून १०० कोटींचा निधी

Next Post

एमआयडीसी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एमआयडीसी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

कुणाल कामरावर फिर्याद दाखल…….. #viral #marathinews #maharashtranews #news

July 20, 2026

माऊलींच्या पालखीचे माळशिरस मध्ये आनंदात स्वागत…… #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले…

July 20, 2026
भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0989353

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!