बार्शी – सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत दत्त प्राथमिक विद्यामंदिर, बार्शीची कु.आरोही भैरु गायकवाड ही विद्यार्थिनी पात्र झाली. तिला वर्गशिक्षिका श्रीमती ललिता चव्हाण तसेच गणित विषयासाठी युवराज जगताप सर व इंग्रजी विषयासाठी मंगेश मोरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन ठोंगे सर, खजिनदार मृणय ठोंगे सर यांनी तिचे अभिनंदन केले. संस्थेच्या व शाळेच्यावतीने कु. आरोही गायकवाड हिला दत्त प्राथमिकचे मुख्याध्यापक श्रीकांत कुंभारे सर, दिलीपराव सोपल प्रशालेच्या मुख्याध्यापक सचिन काळे सर यांचे हस्ते बुके देऊन सन्मानित करण्यात आले. मार्गदर्शक वर्गशिक्षिका श्रीमती चव्हाण मॅडम यांचा ही प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती अरुणा मठपती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही शाळेतील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















