सोलापूर : शिवरायांचा जयघोष, दीपमाळेचा लखलखाट आणि भक्तिमय वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने दिवाळी पाडवा साजरा करण्यात आला. यानिमित्त डाळिंब आड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच परिसरात दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शौर्य दिनानिमित्तही शिवरायांना अभिवादन करून त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा देत परिसर शिवमय केला.
या कार्यक्रमाला शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्माकर नाना काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, राजन भाऊ जाधव, श्रीकांत डांगे, तात्या वाघमोडे, प्रीतम परदेशी, अंबादास शेळके, मतीन बागवान, सदाशिव पवार, जीवन यादव, ब्रह्मदेव पवार, प्रकाश ननवरे, गजेंद्र साळुंखे, सुनील शेळके, नागेश वडणे, बजरंग जाधव, बापू जाधव, विजय पुकाळे, लहू गायकवाड, अंबादास सपकाळ, सुभाष पवार, नामदेव पवार, दादा सुरवसे, सचिन स्वामी, गौरव काळे, तुषार गायकवाड आणि देविदास घुले यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवरायांच्या विचारांचा जागर आणि दीपोत्सवाचा आनंद यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
Views: 8