सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी शिवसेना शेतकरी मदत कक्षाचे खासदार ज्योती वाघमारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील शिवसैनिकांना केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रकाश राठोड (माजी सहाय्यक आयुक्त , विशेष कार्यकारी अधिकारी) यांनी सोलापूर-विजापूर रोड, अर्जुन टॉवर येथे शिवसेना शेतकरी मदत कक्ष सुरू केला आहे.
यावेळी खासदार ज्योती वाघमारे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना कोणतीही गरज लागल्यास त्यांनी शिवसेना शेतकरी मदत कक्षाची संपर्क साधावे असे आवाहन केले.
यावेळी प्रकाश राठोड यांनी आपले विचार व्यक्त करताना हे मदत कक्ष म्हणजे माझ्यासाठी मंदिर आहे. इथे येणारा प्रत्येक शेतकरी हा माझ्यासाठी देव आहे अशी भावना व्यक्त केली.शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास 914605 5030 या नंबरवर संपर्क करावा. आमचे शिवसैनिक आपल्याला मदत करण्यासाठी सदैव हजर राहतील असे आवाहन प्रकाश राठोड यांनी यावेळी केले.
शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून या मदत कक्षातून राज्य आणि केंद्र सरकारच्या 22 योजना या मोफत सेवा म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच चारा छावणी, पाणी, व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे सामूहिक विवाह यासाठी देखील या कक्षातून मदत करण्यात येणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील, मनीष काळजे, नगरसेवक प्रियदर्शन साठे , लोकसभा प्रमुख सुजित खुर्द,अर्जुन सलगर , शराजाभाऊ अलुरे, राज्य कामगार श्रीकांत बने, रेल्वे बोर्ड सदस्य अब्दुल गफूर, पूजा खंदारे,प्रमिला कुराडे, अंकुश राठोड, देवा विटकर,संजय सांगूळगी ,राजकुमार शिंदे,राम हताळे , मलिंनाथ घाले, सुरेश बिद्री, विजय जाधव, श्रीनिवास पोतण , अंकित राठोड तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.