सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, सोलापूर शहराच्या वतीने वटपौर्णिमेचा पारंपरिक आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने व आनंदी वातावरणात संपन्न झाला. महिलांनी भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना केवळ सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवत नाही, तर आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीही सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
महिला आघाडीच्या सोनाली भागानगरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्ष जयश्री हिरेमठ यांच्या पुढाकाराने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. सर्व महिलांनी वडाच्या वृक्षाची पूजा करून आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.




















