दिनांक 20 /5/2024 रोजी सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील कंबर तलाव येथे एका महिलेने तलावामध्ये उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तलावामध्ये एक महिला उडी मारत असल्याचे पाहून या ठिकाणी असलेल्या युनिटी लेक व बोट क्लब तेथे कार्यरत असलेले कर्मचारी जुबेर शेख, इलियास शेख,श्रीनिवास परदेशी यांनी वेळेचे भान ठेवून त्या महिलेला वाचवण्यास तत्परता दाखवली.
व त्या महिलेचे प्राण वाचवले. या महिलेचे जीव वाचवण्यात यश त्यांना यश मिळाले. त्या महिलेला सुखरूपरीत्या बाहेर काढून जुबेर शेख, इलियास शेख,श्रीनिवास परदेशी नवीन जीवनदान दिले. या तिघांचे सर्वत्र कौतुक होत आहे