कुर्डुवाडी – क्रेटा व आय टेन कारच्या झालेल्या समोरा समोर धडकेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका सिनियर बँक इन्सपेक्टर अनिल कोंडीबा बाबर वय ५८ यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर क्रेटा गाडीतील पाच जण किरकोळ जखमी.ही घटना दि.१३ रोजी दु. ३ वा. सुमारास कुर्डुवाडी – टेंभुर्णी रस्त्यावर कुर्डू ता.माढा शिवारात माळी पाटीजवळ घडली.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कुर्डुवाडी शाखेतील कामकाज पूर्ण करुन तालुका सिनियर बँक इन्सपेक्टर अनिल कोंडीबा बाबर हे आपली आय १० कार गाडीने ( एम एच ४५ एन ४०६७ ) टेंभुर्णीच्या दिशेने जात असताना अकलूजहून नातेवाईकांना भेटून डोमगाव ता. परांड्याकडे जाणाऱ्या चारचाकी क्रेटा कारगाडी( एम एच ४५ बीडी ७००८) ची कुर्डू ता.माढा शिवारात माळी पाटीजवळ समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की आय १० मधील तालुका सिनियर बँक इन्सपेक्टर अनिल कोंडीबा बाबर हे जागीच ठार झाले. तर क्रेटा गाडीतील निशा अनिल गायकवाड ३५,सांची कुमार गायकवाड १२, पल्लवी कुमार गायकवाड ३५ ,आरोही अनिल गायकवाड सर्व रा. डोमगाव ता.परंडा व विकास महेश शिंदे ३१ रा.अकलूज ता.माळशिरस हे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर कुर्डुवाडी येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
याबाबत विकी जितेंद्र गायकवाड रा.अकलूज याने कुर्डुवाडी पोलिसांत खबर दिली असून पुढील तपास पो.ह.अमर लिमकर हे करीत आहेत
Post Views: 23