सांगोला – नाझरे (ता.सांगोला) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. याप्रसंगी प्रतिमेचे पूजन सोलापूर जि.प.चे शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या शुभहस्ते व सहा.पो.नि.सिकंदर वर्धन, रविराज शेटे, शामराव वाघमारे, अक्षय सरगर, बाळासो वाघमारे, सचिन वाघमारे, महेश वाघमारे, सागर वाघमारे, रोहन वाघमारे, अजय भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची गीते, भारुडे सादर करण्यात आली. शेवटी सर्वांचे आभार नितीन रणदिवे यांनी मानले.
Post Views: 7