Friday, September 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जोड कालवा की केवळ जोडलेली आश्वासनं ? राजकीय इच्छाशक्तीचा कस : सीना–भोगावती प्रश्न

तरुण भारतbyतरुण भारत
February 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळूज – लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येक निवडणुकीत भाषणांच्या सर्वोच्च स्थानी असलेला मुद्दा म्हणजे सीना–भोगावती नदीजोड कालवा. गेली तब्बल ३० वर्षे नरखेड पंचक्रोशीत या विषयावर सभेत जोरदार भाषणं होतात, आश्वासनांची सरबत्ती होते; मात्र मतदान संपताच हा विषय पुन्हा फाईलमध्ये गाडला जातो. गेल्या तीन दशकांचा अनुभव सांगतो की या प्रश्नावर कृतीपेक्षा आश्वासनांनाच अधिक पाणी घातले गेले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व बार्शी तालुक्यांतून वाहणारी भोगावती नदी आणि तिच्या काठावरील परिसर हा अवर्षणप्रवण आहे. येथील जमीन काळी, कसदार आणि उच्च प्रतीची असतानाही शेतकरी पाण्यापासून कायम वंचित राहिला आहे. पावसाळ्यात कधीतरी वर्षातून एकदा भोगावती भरून वाहते; मात्र उर्वरित वर्षभर ती तहानलेलीच असते. परिणामी हा परिसर वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत अडकून राहिला आहे.

भोगावती नदीकाठावरील माढा तालुक्यातील अंजनगाव, सुर्डी, उंडेगाव; बार्शी तालुक्यातील काळेगाव, इर्ले, ढोराळे, यावली, तडवळे, वैराग, मुंगशी (वा); मोहोळ तालुक्यातील मनगोळी, वाळूज (दे), भैरववाडी, देगाव (वा), नरखेड, मसलेचौधरी, डिकसळ, भोयरे, हिंगणी (नि.); तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी, कळमण, भागाईवाडी आदी अनेक गावे या पाण्याअभावी त्रस्त आहेत.

दुसरीकडे उजनी धरण भरल्यावर भीमा व सीना नदीतून अतिरिक्त पाणी सोडावे लागते, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होते. हेच वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जर सीना–भोगावती जोड कालव्याच्या माध्यमातून वापरले, तर संपूर्ण परिसराचे चित्र बदलू शकते. प्रश्न असा की हे वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्याची दूरदृष्टी का दाखवली जात नाही ? सीना–भोगावती नदीजोड कालव्याचा प्रस्ताव यावर ठोस उत्तर देतो.

या प्रस्तावानुसार, सीना नदीवरील रिधोरे (ता. माढा) येथील बंधाऱ्यातून कालवा व बोगद्याच्या माध्यमातून पाणी इर्ले (ता. बार्शी) येथे भोगावती नदीत सोडण्यात येईल. पुढे भोगावती नदीतून भोयरे (ता. मोहोळ) बंधाऱ्यातून नान्नज मार्गे एकरुख तलाव (सोलापूर) येथे पाणी नेण्याचा सुमारे ५५ किमीचा प्रस्ताव आहे. यामुळे भोगावती नदीअंतर्गत ५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, उजनी धरणातून भीमा–सीना जोड कालव्याद्वारे ज्या पद्धतीने गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले जाते, त्याच धर्तीवर सीनेतून भोगावतीत पाणी नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. सीना नदीची तळपातळी १५७५ फूट, तर भोगावती नदीची तळपातळी १५४० फूट आहे. जवळपास ३५ फूट नैसर्गिक उतार आणि केवळ २३ किमी अंतर असल्याने कमी खर्चात, कायमस्वरूपी पाणीपुरवठा शक्य आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. ही योजना तांत्रिकदृष्ट्या शक्य, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या कमी नुकसान करणारी आहे. 

या प्रश्नासाठी सन २००६ मध्ये चार तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ‘पाणीसंघर्ष समिती’ स्थापन केली. या समितीचे संस्थापक अध्यक्ष वाळूजचे कै. सुशांत कादे होते.(मा. सभापती आरोग्य व शिक्षण समिती, जि. प सोलापूर ) प्रशासकीय सर्वेक्षणे, राजकीय गाठीभेटी, संबंधित मंत्र्यांसोबत बैठका—शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटू शकतो, यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांपर्यंतही हा विषय पोहोचवण्यात आला होता आणि त्यावेळी सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. सध्या या समितीचे अध्यक्षपद डॉ. संदेश कादे यांच्याकडे असून तेही सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांत फक्त राजकीय आश्वासनं मिळाली, प्रत्यक्षात शासनपातळीवर ठोस कृती झाली नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प आजही प्रलंबित आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकल्प नदीजोड योजनेच्या धोरणात बसणारा, कमी खर्चात जास्त लाभ देणारा आणि विद्यमान शासनाच्या जाहीर भूमिकेशी सुसंगत आहे. सीना–भोगावती जोड कालवा हा त्याचा आदर्श नमुना ठरू शकतो. कमी खर्च, जास्त लाभ आणि पूरनियंत्रण—तीन उद्दिष्टे एकाच प्रकल्पातून साध्य होतात तरीही प्रश्न सुटत नाही, ही खेदाची बाब आहे. नरखेड गटातील शेतकरी व मतदारांची ठाम मागणी आहे की शासनाने या जोड कालव्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.

दर पंचवार्षिक निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरतो. प्रचारसभा या विषयाशिवाय होत नाहीत—सत्ताधारी असोत वा विरोधक. पण २०–३० वर्षांत प्रश्न सुटत नाही, हीच शोकांतिका आहे. गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची आणि सर्वपक्षीय ऐक्याची. अनिश्चित पावसमान, सततची निसर्गाची अवकृपा, घटते शेतीउत्पन्न आज शेती असूनही परवडत नाही. अशा वेळी सीना–भोगावती नदीजोड कालवा हा केवळ विकास प्रकल्प नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे.

हा प्रश्न सुटेल की नाही, की नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा भाषणं आणि आश्वासनंच राहतील—हे येणारा काळच ठरवेल.

बॉक्स हायलाइट (Fact Box)-

सीना–भोगावती नदीजोड कालवा : 

• प्रस्तावित कालवा : सीना–भोगावती नदीजोड

• प्रमुख स्रोत : सीना नदी – रिधोरे बंधारा (ता. माढा)

• अंतिम टप्पा : भोगावती नदी –इर्ले बंधारा (ता. बार्शी)

• एकूण अंतर : सुमारे २३ कि.मी. (सीना–भोगावती)

• एकूण प्रस्ताव लांबी : अंदाजे ५५ कि.मी.

• बोगद्याची लांबी : १२.५० कि.मी.

• कालव्याची लांबी : ११.५० कि.मी.

• सीना नदी तळपातळी : १५७५ फूट

•भोगावती नदी तळपातळी : १५४० फूट

• नैसर्गिक उतार : सुमारे ३५ फूट (गुरुत्वाकर्षणावर आधारित प्रवाह)

• प्रस्तावित लाभ क्षेत्र : सुमारे ४०,००० हेक्टर

• लाभार्थी तालुके : मोहोळ, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर

• भरून येणारे बंधारे : ५ (कोल्हापूर पद्धतीचे )

•पाणीपुरवठा: १०० गावे 

• प्रकल्पाचे फायदे :

– पूरस्थितीत वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग

– दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाणी

– कमी खर्चात जास्त लाभ

– शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

• प्रलंबित कालावधी : सुमारे ३० वर्षे

• मुळ अडथळा : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व प्रशासकीय विलंब

Post Views: 114
Previous Post

खातगाव नं 1 शाळेतील विद्यार्थ्यांची नावे पाठवली जाणार थेट चंद्रावर 

Next Post

संभाजी आरमार पालखी सोहळा प्रमुखपदी अर्जुन शिवसिंगवाले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संभाजी आरमार पालखी सोहळा प्रमुखपदी अर्जुन शिवसिंगवाले

ताज्या बातम्या

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1228673

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!