Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कौतुकास्पद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा जेईई परीक्षेत डंका; शेतकऱ्याचा मुलगा राज्यात पहिला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 18, 2024
in maharashtra
0
कौतुकास्पद! ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा जेईई परीक्षेत डंका; शेतकऱ्याचा मुलगा राज्यात पहिला
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाशिममधील निलकृष्ण गजरे जेईई परीक्षेत महाराष्ट्रात पहिला आला आहे. त्याने जेईई परीक्षेमध्ये १०० पैकी १०० टक्के मिळवले आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलानं जेईई परीक्षेमध्ये १०० पैकी १०० टक्के मिळवून इतिहास रचला आहे. त्याने महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह राज्यभरातून त्याचं मोठं कौतुक केलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आय आय टी सारख्या केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी गाह्य धरल्या जाणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (जेईई) निकाल नुकताच लागलेला आहे..

 

देशभरात २३ तर महाराष्ट्रातून ३ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० टक्के गुण मिळवले आहेत. त्यामध्ये वाशिमसारख्या छोट्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या निलकृष्ण गजरेचा नंबर असून तो महाराष्ट्रातून प्रथम आला आहे. निलकृष्ण हा मध्यमवर्गीय शेतकऱ्याचा मुलगा असून त्याचे वडील हे गावी शेती करतात. त्यांचं अवघं बारावीपर्यंत शिक्षण झालं असून आपलं उच्च शिक्षणाचं अधुर राहिलेलं स्वप्न मुलानं पूर्ण करावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे मुलाच्या शिक्षणावर सुरुवातीपासूनच त्यांनी भर दिला. त्याला गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत न टाकता त्यांनी सुरुवातीलाच अकोला येथील त्याच्या आत्याकडे पाठवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकलं.

 

नंतर कारंजा येथील जेसी चवरे हायस्कूल येथे त्याने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले. दहावीत त्याने ९८ टक्के गुण मिळवून तो प्रथम आला होता. त्यामुळे त्याच्या वडिलांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची JEE ची तयारी सुरू केली. तयारी करत असताना त्याने इन्स्टिट्यूटची परीक्षा दिल्यानंतर त्याला स्कॉलरशिप मिळाली. त्यातून त्याने ऑनलाईन क्लासेस लावले. अकरावी बारावीसाठी त्याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील बुरूनले कॉलेज येथे टाकले. सध्या तो इथेच बारावीचे शिक्षण घेत असताना त्याने जेईईची परीक्षा दिली. सर्व विषयात पैकीच्या पैकी म्हणजेच १०० टक्के गुण मिळवून तो महाराष्ट्रात पहिला आला. आता पुढे आयआयटीला त्याचा नंबर लागावा आणि त्याने कॉम्पुटर इंजिनियर व्हावं, अशी त्याच्या बाबाची ईच्छा आहे.

त्यासाठी वडील म्हणून कितीही कष्ट घेण्याची वेळ आली तरी मागे हटणार नाही, असा विश्वास त्याच्या वडिलांनी व्यक्त केला. निलकृष्णाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्याच्या वडिलांना राज्यभरातून अभिनंदनाचे फोन येत आहेत. तर बरेच जण त्यांच्या मुलांसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत. निर्मलकुमार गजरे ही त्यांच्या मुलाने कशी तयारी केली, याविषयी त्यांना मार्गदर्शन करत आहेत. निलकृष्णच्या आजोबांकडे पंधरा एकर शेती आहे. मात्र शेतीत येणाऱ्या सततच्या संकटामुळे शेती परवडत नसल्यानं मुलानं उच्च शिक्षण घ्यावं आणि नोकरी करावी, अशी निलकृष्णाच्या आजी-आजोबांची इच्छा होती.

 

मात्र निलकृष्णाच्या वडिलांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन शेतीत वळले. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं नाही. त्यामुळे निलकृष्णच्या आजी आजोबांचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. मात्र आता नातू त्यांचं स्वप्न पूर्ण करत असून तो राज्यातून प्रथम आल्यामुळे त्यांनाही मोठा आनंद झाला आहे. जेईई सारख्या कठीण परीक्षेत वाशिमसारख्या ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलाने १०० पैकी १०० टक्के गुण मिळवणे ही अभिमानाची बाब असून इतर विद्यार्थांसाठी प्रेरणादायी आहे.

Post Views: 80
Previous Post

सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेतली

Next Post

सोलापूर – गुणवंत कर्मचारी निवड कार्यवाही सुरू, चौघांचे प्रस्ताव प्राप्त

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सोलापूर – गुणवंत कर्मचारी निवड कार्यवाही सुरू, चौघांचे प्रस्ताव प्राप्त

सोलापूर - गुणवंत कर्मचारी निवड कार्यवाही सुरू, चौघांचे प्रस्ताव प्राप्त

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907325

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697