बार्शी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर २ उपळाई (ठो) येथील उपक्रमशील, कार्यतत्पर,शाळेच्या सर्वांगीण विकासात कायम अग्रेसर राहून तालुक्यात गुणवत्तेत आघाडीवर असणाऱ्या शाळेचे मुख्याध्यापक अनिल काळे यांना ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचा सन २०२६ चा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या उपायुक्त सौ.सुवर्णा पवार खंडागळे मॅडम यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चरणसिंग रजपूत (पोलीस उपनिरीक्षक सोलापूर), अनिल बनसोडे (प्रशासनाधिकारी बार्शी नगरपालिका), अमृत नाना राऊत (माऊली उद्योग समूह), नंदकुमार खंदारे(अभियांत्रिकी सल्लागार उद्योजक पुणे), गोविंद तापडिया, नंदकुमार बरगे, हेमंत शिंदे, राहुल वाणी (अध्यक्ष), संतोष शेळगावकर, अजय तिवारी (सचिव), माणकोजी ताकभाते (खजिनदार) यांचेसह ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Post Views: 9