बार्शी – करमाळा पोलीस ठाणे गुन्हा क्र. ३८३/२०२६ मध्ये पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ चे कलम ९ व १५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम ३०३(२) अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी जयवर्धन हनुमंत दैन यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश, बार्शी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणात आरोपीच्यावतीने न्यायालयासमोर असा युक्तिवाद करण्यात आला की, संबंधित वाहन व मुद्देमाल शासनाने आधीच जप्त केलेला असून तपासासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नाही. तसेच आरोपी तपासात पूर्ण सहकार्य करण्यास तयार असल्याचे न्यायालयास निदर्शनास आणून देण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. शिवाजी क्षीरसागर, ॲड. पवन क्षीरसागर आणि ॲड. अक्षय बिडबाग यांनी काम पाहिले.
Post Views: 10