वेळापुर – येथील श्री अर्धनारी नटेश्वराचा साड्याचा कार्यक्रम गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हजारो भाविकांच्या साक्षीने हर हर महादेवाच्या जय घोषात संपन्न झाला.
डफडे व हलगीच्या निनादात निघालेली कावड यात्रा व शोभेच्या दारु कामाने वेळापूर नगरी उजळून निघाली .
रात्री ८.३० वाजता अर्धनारी नटेश्वरला पुजेचे मानकरी गंगाधर होडगे यांचा साड्याचा मानाचा पोशाख देशपांडेच्या वाड्यातून लता होडगे, मानकरी गौरीशंकर गाढवे, शामराव गाढवे, अक्षय गाढवे, आकाश गाढवे, श्रीशैल गाढवे, प.स. सदस्या विमलताई जानकर,मिलींद सरतापे,
वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे, उपसरपंच नानासाहेब मुंगूसकर, ग्रामपंचायत अधिकारी कैलास सुरवसे, यात्रा कमिटी अध्यक्ष काशिनाथ आडत, उपाध्यक्ष अॅड विठ्ठल मंडले, उपाध्यक्ष रणजीत साठे , कार्याध्यक्ष अमोल मंडलिक, खजिनदार दादा तुपे, सरचिटणीस विनायक भगत, सचिव अभिजीत साठे, सेक्रेटरी विजय पवार, सदस्य मनोहर माने तसेच
माजी उपसरपंच जावेद मुलाणी , महादेव म्हेत्रे, शिवाजी सावंत, युवराज मंडले, शिवाजी मंडले, धनंजय शिवपूजे, राहुल सराटे, व होडगे आणि देशपांडे परिवार आदिं सर्वांनी मानाचा आहेर वाजत गाजत अर्धनारी नटेश्वराच्या मंदिरात आणला.
रात्री ११.०० सुमारास मानाच्या सर्व कावडी मंदिरात येण्यास सुरुवात झाली. सर्व मानाच्या कावडी देवाच्या दारात आल्यानंतर राञी १: ०० वाजता देवाच्या साड्याचा कार्यक्रम विधिवत पुजेला सुरुवात झाली . यावेळी शोभेचे दारू काम करण्यात आले. यावेळी देवाची विधीवत पुजा व आरती होऊन पालखी मधील महादेवाला व पार्वतीला बाशिंगे बांधण्यात आली. त्या ठिकाणी पालखी मधील देवाची आरती होऊन साड्याचा कार्यक्रम रात्री २:०० वाजता संपन्न झाला. यानंतर भाविकांनी देवाची पालखी खांद्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली असता भाविकांनी पालखीतील अर्धनारी नटेश्वरावर फुलांचा वर्षाव केला, यानंतर पालखी गावाला प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराच्या प्रवेश दारापाशी आणण्यात आली . व तेथून देवाची पालखी सर्व मानाच्या कावडी समवेत मिरवणुकीने वाजत गाजत निघाली .
पहाटे उशीरा ग्राम प्रदक्षिणा नंतर देवाची पालखी व सर्व कावडी मंदिरात आणण्यात आल्या .
देवाच्या साड्याच्या कार्यक्रमाचे पोरोहित्य पुजारी गौरीहर गुरव, सतीश गुरव, रविराज गुरव, महेश स्वामी, विवेक जोशी यांनी केले. तसेच देवाच्या साडीच्या कार्यक्रमा दिवशी रात्री अघोरी बाबा यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
साड्याच्या कार्यक्रमानिमित्त मंदिर परिसरात फुलांची व केळींच्या खुटांची सुंदर अशी सजावट केली होती. देवाच्या नंदिला झूल घालण्यात आली होती. मंदिराच्या आत मध्ये व परिसरामध्ये लाईटच्या माळा टाकून सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले होते.
देवाचा साड्याचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.
साड्याच्या कार्यक्रमाला शंकरराव काकुळे, सुरेश पिसे, जीवन जानकर, धनंजय माने देशमुख, संजयआबा मंडले, शिवाजी मोहिते, सौ प्रियंका आडत, सौ सीमा खाडे, रायचंद खाडे, अशोक साठे , जवान माने देशमुख, भैय्या कोडग, संतोष मेहत्रे, सचिन मदने तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारीवर्ग, यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला, पुरुष भाविक साड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
—————————————

















