Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खेळाडूंच्या क्रीडा गुणांसाठी संघटना मैदानात; राज्यभर ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्याचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
July 16, 2026
in west maharashtra
0
खेळाडूंच्या क्रीडा गुणांसाठी संघटना मैदानात; राज्यभर ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्याचा इशारा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​कल्याण – शासनाच्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर समाविष्ट केलेल्या ४४ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना क्रीडा गुण देण्यास शासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप क्रीडा संघटनांनी केला आहे. या प्रलंबित निर्णयामुळे राज्यातील लाखो खेळाडूंचे शैक्षणिक व क्रीडा भवितव्य टांगणीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील ४४ क्रीडा संघटनांनी एकत्र येत क्रीडा अधिकारी कार्यालयांसमोर ‘थाळी वाजवा’ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

​’शालेय खेळ-क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य’ या संघटनेने याबाबत अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, येत्या १० दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन आणि त्यानंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांना सादर केले आहे.

​१३ वर्षांपासून प्रश्न प्रलंबित

​सन २०१३ मध्ये तत्कालीन क्रीडामंत्री पद्माकर वळवी आणि क्रीडा आयुक्तांच्या मान्यतेने ४४ क्रीडा प्रकारांना शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये विनाअनुदान व विनागुणांकन प्रायोगिक तत्त्वावर स्थान देण्यात आले होते. भविष्यात या खेळाडूंना क्रीडा गुणांकन व इतर सवलती देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या १३ वर्षांपासून सर्व क्रीडा संघटना शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करत आहेत. मात्र, अद्यापही या खेळाडूंना गुणांचा लाभ मिळालेला नाही.

​आदेशानंतरही अंमलबजावणी शून्य!

​या ४४ क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंना गुण व सवलती मिळाव्यात म्हणून उपमुख्यमंत्री (स्व.)अजितदादा पवार, माजी क्रीडामंत्री सुनील केदार, संजय बनसोडे, दत्तामामा भरणे, तसेच विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनीही वेळोवेळी शिफारस केली आहे. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईतील मंत्रालयात तत्कालीन क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांना गुणांकन देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही.

​या प्रलंबित निर्णयामुळे महाराष्ट्रातील तब्बल ४ लाख खेळाडू, प्रशिक्षक आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे. पुढील १० दिवसांत निर्णय न झाल्यास राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये आणि शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी (पुणे) येथील मुख्य कार्यालयासमोर खेळाडू व पालकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष शाम भोसले व सचिव शिवाजी साळुंखे यांनी दिला आहे.

——

न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही​

​“गेली अनेक वर्षे आम्ही राज्यातील लाखो खेळाडूंना क्रीडा गुण मिळावेत म्हणून पाठपुरावा करत आहोत. मात्र, शासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे. क्रीडामंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदने देऊन चर्चा झाली, तरीही ठोस निर्णय झालेला नाही, हे दुर्दैवी आहे. यावर्षी खेळाडूंना गुण मिळाले नाहीत, तर संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. न्याय मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”

— शाम राजाराम भोसले

अध्यक्ष, शालेय खेळ आणि क्रीडा संस्था, महाराष्ट्र राज्य

——–
खेळाडूंवरील अन्याय दूर करावा

​“राज्य शासनाने शालेय स्पर्धांमध्ये नवीन खेळांचा समावेश करून क्रीडा संस्कृतीला नक्कीच चालना दिली आहे. परंतु, या खेळाडूंना क्रीडा गुण, सवलती आणि आवश्यक सुविधा मिळाल्या तरच खेळाडू खऱ्या अर्थाने प्रवाहात टिकून राहतील. शासनाने राज्यातील या ४४ क्रीडा संघटनांच्या शालेय गुणांचा प्रश्न तातडीने सोडून खेळाडूंवरील अन्याय दूर करावा.”

— तुकाराम ठोंबरे, अध्यक्ष, म्युझिकल चेअर स्केटिंग असोसिएशन.

Post Views: 5
Previous Post

सोलापूरच्या तिकीट लिपिकाची राष्ट्रीय जलक्रीडा चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर गवसणी

Next Post

शशीभूषण यलगुलवार सरांचा मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे यांच्यावतीने सत्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शशीभूषण यलगुलवार सरांचा मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे यांच्यावतीने सत्कार

शशीभूषण यलगुलवार सरांचा मा.सुशीलकुमार शिंदे दृष्टीबाधित निवासी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे यांच्यावतीने सत्कार

ताज्या बातम्या

अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

अत्याधुनिक मशीन द्वारे मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

July 16, 2026

अजित पवार जयंतीला शासकीय मान्यता;  २२ जुलैला सर्व सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालयांत प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचे आदेश

July 16, 2026
बार्शीत माईर्स एमआयटीचे नवे डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू

बार्शीत माईर्स एमआयटीचे नवे डिप्लोमा अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू

July 16, 2026
आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी पुढे यावे

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी धर्मादाय संस्थांनी पुढे यावे

July 16, 2026
खड्ड्यांच्या विळख्यात मंगळवेढ्याचा मुख्य रस्ता; प्रशासन झोपेत, आषाढी वारी तोंडावर, संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्गही धोकादायक

खड्ड्यांच्या विळख्यात मंगळवेढ्याचा मुख्य रस्ता; प्रशासन झोपेत, आषाढी वारी तोंडावर, संत गजानन महाराजांच्या पालखीचा मार्गही धोकादायक

July 16, 2026
माळशिरस च्या वैभवात भर,पालखी पूर्वी महामार्ग प्रकाशमय

माळशिरस च्या वैभवात भर,पालखी पूर्वी महामार्ग प्रकाशमय

July 16, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास सुमारे ५६.५९ लाख रुपयांच्या सोने पादुकांचे दान

July 16, 2026
माळशिरस येथील कन्या प्रशालेत साक्षरता दिन साजरा

माळशिरस येथील कन्या प्रशालेत साक्षरता दिन साजरा

July 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0979925

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!