सोलापूर – दाजी पेठेतील भगवान श्री व्यंकटेश्वर मंदिर परिसरात रांगोळीच्या पायघड्या. पानाफुलांनी वातावरण सजवले होते. ‘व्यंकटरमण गोविंदा गोविंदा…’ च्या जयघोषात अखंड होता. मंदिरात भगवान व्यंकटेश, श्रीदेवी, भूदेवी यांच्या वैभवशाली विवाह सोहळ्याची तयारी. पाचपासुनच भाविक येत होते. भूदेवीला गुलाबी तर श्रीदेवीला काठापदराची पैठणी परिधान केली होती. भगवान व्यंकटेश यांना पितांबर, अलंकार आभूषणे, फुलांचा हार यामुळे जणू देवाचे मनमोहक, राजस, लोभस रूप सगळ्यांच्या डोळ्यात साठवून होते अन् हृदयात देवाचे स्मरण.
मंगल्याचे प्रतीक, वैभवशाली सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि साक्षात भगवान व्यंकटेश यांच्या विवाह सोहळ्या पाहण्यासाठी भाविक आतुर होते. दक्षिणात्य पद्धतीचे वादन व देवाची पालखी याजत गाजत आली. प्रकाश दिसण्याचा क्षण होता. सां. 6 ला येदुरुकोल्लूर सोहळा (घर-जावई पाहुणी) नातेवाईकांकडून पाहण्याचा व बोलण्याचा सोहळा सुरू झाला. वधूकडील मंडळी भगवान व्यंकटेश यांचे गुणगान सांगत होते, वरपक्षाकडील मंडळी श्रीदेवी, भूदेवीचे गुणगान सांगत होते. संवादरूपी हा सोहळा समारंभे पार पडताच सुरू होता. दोन्ही कडील पाहुण्यांची भेट, स्वागत झाले. देवांची मुहूर्त काढण्यात आली. पुन्हा हा सोहळा मंडपात आला, विवाहास सुरुवात झाली अन् रात्री आठच्या कल्याणोत्सव सोहळा (विवाह) झाला. टाळ्यांचा गजर अन् व्यंकटरमण गोविंदा गोविंदा… चा गजर झाला.
चौकट
आज रथोत्सव मिरवणूक, हनुमान सेवा
शुक्रवार, दि. २० नोव्हेंबरला पहाटे ५.३० वाजता उत्सवमूर्तींचा अभिषेक, सकाळी ९.३० वा. होमहवन, दुपारी १२ पर्यंत हनुमान वाहन सेवा, प्रसाद. सायंकाळी ४ नंतर मंदिरासमोर पालखी मिरवणूक सोहळा निघणार आहे.
चौकट
असा असेल मिरवणूक मार्ग
जोडबसवण्णा चौक, राजेंद्र चौक, कन्ना चौक, औद्योगिक बँक, मार्कंडेय चौक, भवानी पेठ, दत्त चौक, पद्मशाली चौक ते मंदिर.




















