विधान परिषदेचे माजी आ. रणजितसिंह मोहिते – पाटील यांच्या प्रयत्नातून हा नवीन रस्ता मंजूर झालेला असून नरसिंहपुर , लवंग, वाफेगांव, श्रीपूर, बोरगांव वरून तो वेळापूर येथे राष्ट्रीय महामर्गास मिळणार आहे .
सध्या या रस्त्याचे काम चालू असून श्रीपूर येथिल दत्त मंदीरा जवळून हा रस्ता जात आहे . नेमक्या या ठीकाणी भाटघर कॅनॉल व नेवरे गावा कडे जाणारा रस्ता समांतर तर दुसरा रस्ता बोरगांव कडे जातो .याठिकाणी पूर्वी कॅनॉलचे दोन्ही बाजूस दगडी सुरक्षा कठडे उभारलेले होते . येथूनच नरसिंहपूर – वेळापूर नवा रस्ता जात असल्याने रस्त्याच्या कामासाठी कॅनॉल मध्ये सिमेंट पाईप टाकण्यासाठी कॅनॉलच्या एका बाजूचा कठडा तोडला असून याठीकाणी मोठे वळण असल्याने नेवरे कडे जाणाऱ्या वाहनांसाठी धोका निर्माण झाला आहे . तरी एखादी अप्रीय घटना घडण्या पूर्वीच त्वरीत कॅनॉलमध्ये सिमेंट पाईप टाकून संरक्षण कठडे उभारणेची ग्रामस्थांची मागणी आहे .
याबरोबरच अलिकडच्या बाजूस याच भाटघर कॅनॉलवरुन उजनीचा कॅनॉल गेलेला आहे .त्याठीकाणीही एका बाजूचा स्वंरक्षक कठडा तुटलेला आहे हे काम सार्वजनिक पाटबंधारेच्या अखत्यारित येते नेमक्या अवघड वळणातील हे दोन्ही कठडे तुटल्याने अपघातास निमंत्रण ठरत आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणाचे संरक्क संरक्षकठडे
– – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – – ठेकेदाराला काम दिले आहे – – – –
– श्रीपूर येथिल दत्त मंदीरा जवळील कॅनॉल मध्ये सिमेंट पाईप टाकण्या साठी ठेकेदाराला काम दिलेले असून सिमेंट पाईपही तयार आहेत . तांत्रीक अडचणी मुळे काम थांबले होते परंतू लवकरात लवकर काम करणेस त्यास बजावले आहे . लवकरच काम पूर्ण होईल .
















