बार्शी – शहरातील तेलगिरणी चौक परिसरात महिलांचा अनैतिक मानवी व्यापार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर बार्शी शहर पोलिसांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विशेष कारवाई केली. सदर कारवाईदरम्यान तेलगिरणी चौक, बार्शी येथील एका वाड्यामध्ये महिलांना चांगले काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध ताब्यात ठेवून त्यांच्याकडून अनैतिक देहव्यापार करुन घेतला जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी १) किरण सागर परांजपे (वय ३३, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर, सध्या रा. तेलगिरणी चौक,
बार्शी), २) मनिषा जाधव (लातूरकर दीदी), ३) सुग्रीव उर्फ सुजित उर्फ आबा बोकेफोडे ४) सविता शेलार (रा. बार्शी) अशा एकूण चार आरोपी विरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. ९३०/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४४ (२), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमध्ये एकूण ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरुन रोख रक्कम, मोबाईल फोन असा १२,८०० /-रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई श्री. सुहास जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग बार्शी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश कुंभार पोलीस निरीक्षक बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्यासह पोसई अभय माकणे, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ / ४८८ प्रविण साठे, मपोहेकॉ/४५१ दुर्गा चौगुले, मपोहेकॉ/१७५२ शारदा सानप, पोहेकॉ/१७५८ बालीशा काळे, मपोना /१०५६ कल्पना यादव, पोकॉ/२१११ अंकुश जाधव, पोकॉ/१९७४ सचिन देशमुख, पोकॉ/६७ कादर तांबोळी, पोकॉ/२०२१ प्रल्हाद अकुलवार, पोकों / १८६० अजिज शेख, मपोकॉ/१०९१ शुभांगी चौबे, चापोकॉ/१९४९ रामेश्वर मस्के, चापोकॉ/८७ भाउसाहेब महानोर या सर्वांनी केली.