बार्शी – येथील मे.सत्र न्यायाधीश श्री. एस. व्ही. केंद्रे यांनी आरोपी शिवलिंग हरिभाऊ गुळवे यास लग्नाचे अमिष दाखवून पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात जामीन मंजूर करुन दिला.
यात अधिक माहिती अशी की, पीडितेने बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शिवलिंग गुळवे याचे विरुद्ध त्याने सन २०२० ते २०२६ या दरम्यान पीडीतेसोबत लग्नाचे खोटे अमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलीस ठाणे येथे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69, 115(2), 352, 351(2), 351 (3) अन्वये गुन्हा दाखल झाला.
सदर फिर्यादीच्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यावरुन पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली व न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये केली. त्यानंतर आरोपीने ऍड. अमोल अलाट यांचेमार्फत बार्शी येथील सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला.
सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादमुळे दि. १० जुलै रोजी न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला.
सदर जामीन प्रकरणात आरोपीतर्फे ऍड. अमोल अलाट, ऍड. विशाल गोणेकर, ऍड. पी. पी. वाघमारे, ऍड. पांडुरंग घोलप यांनी काम पाहिले तर फिर्यादी तर्फे ऍड.सुदर्शन सोनवणे, ऍड. योगीराज पुरवंत यांनी काम पहिले.
Post Views: 8