पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव व आसपासच्या परीसरात बेंदुर सण मोठया उस्हात साजरा करण्यात आला.यंदाचा सण हा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला.वर्षभर आपल्या मालकांसाठी काबाडकष्ट करणाऱ्या सर्जा_ राजाच्या रुणातुन मुक्त होण्यासाठी हा सण साजरा करण्यात येतो.पिलीव येथे वेशीला बांधलेले मानाचे तोरण करणसिह बाबुराव पाटील यांच्या हस्ते तोडुन वेशीपासुन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.ही मिरवणूक पिलीव बाजारपेठेतून वाजत गाजत पारंपारिक नृत्याचा वापर करुन काढण्यात आली.या मिरवणुकीचा शुभारंभ करताना बाबुराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अमोल मदने, विठ्ठल अप्पा मदने, अरुण मदने, बाबुराव कदम, शामतात्या मदने, बाळु मदने, लहु पाटील, नजीर मुलाणी, गोरख जरग, राजेंद्र जाधव, मोहन मदने,हनुमंत मदने, विजय मदने, उमेशभाऊ सरवदे, जितेंद्र पाटील, नबाजी मदने,यांच्यासह झिंजेवस्ती, पिलीव, कुसमोड भागातील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बेंदुर सणादिवशी शेतकरी आपल्या बैलांना ,जनावरांना धुवुन घेतात नंतर हिंगुळ लावतात, शेंब्या, बेगड, अंगावर वेगवेगळा रंग लावुन,नवीन कासरे, मोरकया, कंडे घालुन छानपणे सजवितात. नंतर सपत्नीक पुजा करुन नेवैद्य चारतात. माञ सध्या बैलांचा किंवा देशी जनावरांची संख्या कमी होत चालली आहे.सध्या बोटावर मोजण्याइतकयाच शेतकऱ्यांकडे बैल आहेत. मशागतीसाठी सध्या ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जात आहे.एकंदरीत यंदा दुष्काळाच्या सावटाखाली पिलीव, सुळेवाडी, झिंजेवस्ती, कुसमोड या भागात बेंदुर सण उस्हात साजरा करण्यात आला.




















