अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून ३९ वर्षामध्ये अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये क्रिडा क्षेत्राची भर पडली आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मंडळा लगत असलेल्या एस.टी. बस वाहनतळ जागेत अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात भारतीय, रणजी, महाराष्ट्र क्रिकेट संघाचे खेळाडू, प्रशिक्षक, निवडकर्ता या मान्यवरांचे उपस्थितीत बुधवारी संपन्न होणार आहे.*
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अक्कलकोट संचलित अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमी उदघाटन मा.ना. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय हवाई राज्यमंत्री, ना. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर, .भरतशेठ गोगावले, रोजगार हमी योजना मंत्री, शेखर निकम, आमदार, चिपळूण, .सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट, .सिद्धाराम म्हेत्रे, माजी गृहराज्य मंत्री, .मिलन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष, महेश गावस्कर, सी.ए. पुणे, जनार्दन उर्फ अण्णा गणपत थोरात, अध्यक्ष, अखिल भारतीय मंडई मंडळ पुणे, विश्वस्त- स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या हस्ते व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि चंद्रकांत पंडित, माजी भारतीय क्रिकेटपटू व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, समीर दिघे, माजी भारतीय क्रिकेटपटू व प्रशिक्षक, .संजय पाटील, सिलेक्टर, रणजी ट्रॉफी, मुंबई व मुंबई क्रिकेट असोसिएशन, TRDO चे चेअरमन, .धर्मराज गोपाल सिंग, सिंगस स्पोर्ट्स, मुंबई,.अॅड. नितीन हबीब, जेष्ठ विधिज्ञ व कायदे विषयक सल्लागार, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट, अॅड. संतोष खोबरे,ओंकारेश्वर उटगे, चार्टर्ड अकाऊंटंट, अरविंद शिंदे, योगेश अहंकारी, आर्कीटेक्ट, बालाजी सलगर, यश इंजिनियरिंग,पुणे, .किरण पाटील, इंजिनिअर्स व कॉट्रॅक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुपौर्णिमा, शके-१९४८ दि. २९ जुलै २०२६ बुधवार रोजी दु. १२.३० वा. संपन्न होणार आहे.
अक्कलकोट शहरासह ग्रामीण भागातील खेळाडूना प्रोत्साहनपर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले क्रिकेट ट्रेनिंग अकॅडमीची संकल्पना न्यासाकडून हाती घेण्यात आलेली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट महिला व पुरुष खेळाडूंना सराव करिता चेंजिग रूम, कॅफे, ओपन जीम इ. सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरचे टर्फ हे दर तासी माफक दर आकारले जाणार आहे. अकॅडमी उभारणी कामी सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे सुनिल मालप, चंद्रकांत रेम्बोर्सो, किशोर बोरामणी, उदय डोके, राजेंद्र गोटे, संतोष बडवे, अभिजित गुंड यांचे सहकार्य लाभले असून, या अकॅडमीच्या टर्फ ची उभारणी धर्मराज सिंग, सिंगस् स्मार्टस, मुंबई यांनी केली आहे.
Post Views: 9