सोलापूर : येथील भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने भटक्यांच्या पालावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.
या जयंती निमित्त भटक्याचे प्रत्येक मुल शाळेत दाखल करण्याचा निर्धार भटके विमुक्त समाजातील महिलांनी केला. शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची सुरुवात म्हणून मुलांना वह्या पुस्तके व शाळेची स्कूल बॅग देण्यात आली. या वेळी विविध समविचारी संस्था, संघटना व्यक्तिंना निमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी यशवंत फडतरे, मल्लेश सूर्यवंशी , प्रा. यशोधरा धोत्रे, वैशाली बनसोडे, युवराज मूळमाने. कीर्तीपाल शिवशरण, विश्वास नागटिळक, सुगत कांबळे, राजेश सुरवसे , मुतप्पा भारती, राजू तेली, मारुती भारती, संतोष भारती, वेंकटेश भारती, लिंगप्पा तेली, हिराम्मा तेली, गौरम्मा भारती, कस्तुरी तेली, बायका तेली व मानवी हक्क अभियान, डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ सोलापूरचे पदाधिकारी उपस्थित होते. रोहिणी गायकवाड यांनी आभार मानले.


















