Saturday, September 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 23, 2024
in maharashtra
0
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत होते. आमदार राजेंद्र पाटणी यांच्यावर मुंबईत  उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.

आजच शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. त्यापाठोपाठ राजेंद्र पाटणी यांच्या निधनाचं वृत्त आल्याने,  राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राजेंद्र पाटणी हे सुद्धा एकेकाळचे शिवसैनिक होते. त्यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राजेंद्र पाटणी हे शिवसेनेकडून 1997 ते  2003 पर्यंत विधानपरिषदेवर निवडून गेले होते.

जन्म 19 जून 1964

1997 ते  2003 पर्यंत ते  विधान परिषदे चे  शिवसेने कडून आमदार  निवडून  गेले होते .

2004 ते 2009   पर्यंत ते   वाशीमच्या कारंजा मतदारसंघात  विधानसभामध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून गेले होते. मात्र  2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा  पराभव झाला.   त्यानंतर पक्षविरोधी कारवाईचा ठपका  ठेवत २०११ मध्ये  त्यांची  शिवसेना  पक्षातून   हकालपट्टी करण्यात आली होती . मात्र  2014च्या निवडणुकीत भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले. त्यावेळी भाजपाकडून कारंजा मतदारसंघातून  त्यांना  उमेदवारी मिळाली. ते निवडून आले.

त्यानंतर भाजपकडून  त्यांना जिल्हाअध्यक्षपद  दिले  गेले, 2019 मध्ये  ते पुन्हा  कारंजा  मतदारसंघात भाजप आमदार म्हणून  निवडून गेले.   कोरोना काळात  त्यांना  दोन वेळा  कोरोना  झाला होता. त्याच दरम्यान किडनी विकाराने त्रस्त होते . त्यानंतर त्यांना त्वचेचा कँसर  झाल्याचं निदान झालं.

गेल्या काही महिन्यापासून ते रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथ ते उपचार घेत होते.  आज  त्याचं सकाळी   9 च्या सुमारास निधन झालं. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांचे  अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या  निधनाने कुटुंबीयासह भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जीवनप्रवास 

  • कारंजा विधानसभेचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी यांचे निधन.
  • वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
  • गेल्या अनेक महिन्यांपासून होते आजारी
  • राजेंद्र पाटणी हे भाजपचे  आमदार.
  • देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख,
  • पूर्वी शिवसेनेकडून विधान परिषद आणि विधानसभेत प्रतिनिधीत्व.
  • १९९७ ते २००३ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातुन विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व.
  • २००४ शिवसेनेच्या तिकिटावर कारंजातून विजयी,
  • २००९ राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके यांच्याकडून पराभव
  • २०१४ भाजपात प्रवेश.
  • २०१४, व २०१९  भाजप कडून कारंजा विधासभेतून विजयी.
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य.
  •  अभ्यासू,अत्यंत शांत  संयमी व्यक्तिमत्व  आणि जिल्ह्याच्या विकासात महत्वाचे योगदान असलेले नेते म्हणून परिचित.

कारंजा विधानसभा मतदारसंघ

कारंजा विधानसभा मतदारसंघ हा वाशीम जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघाची निर्मिती 1978 मध्ये झाली. यापूर्वी हा मतदार संघ अकोला जिल्ह्यामध्ये होता.कारंजा शहर हे ऐतिहासीक आणि पौराणिक महत्व असलेल शहर आहे.दत्तगुरुचे जन्मस्थान असलेल्या गुरु मंदिरामुळे या शहराची देशभरात ओळख आहे.

औद्योगिक वसाहत शहराला पाणी पुरवठा करणारी योजना ,तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. येथील कापसाची बाजारपेठ देशविदेशात ओळखली जायची.

या मतदारसंघामध्ये आतापर्यंत मतदार संघाबाहेरील उमेदवार निवडून येत आहेत.1978 मध्ये पहिला आमदार बनण्याचा मान अरविंद देशमुख यांना मिळाला. त्यानंतर या मतदारसंघामध्ये कोणत्याही उमेदवाराला आपला गड फार खाळ राखता आला नाही.2009 मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांचे मेहुणे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश डहाके हे पहिले स्थानिक आमदार म्हणून निवडून आले.

शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांचा त्यांनी पराभव केला.या पराभवासाठी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी जवाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.पक्षविरोधी आरोप केल्यामुळे राजेंद्र पाटणी यांची पक्षातून हकालपट्टी केली.हकालपट्टीनंतरही राजेंद्र पाटणी राजकारणामध्ये शांत बसले नाहीत. 2014 च्या निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवून जिंकली.या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रकाश डहाके आणि भाजपाचे राजेंद्र पाटणी यांच्यात लढत झाली आणि मोदी लाटेमध्ये राजेंद्र पाटणी हे 4047 मतांनी निवडून आले. आता हा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे.

या मतदारसंघात मराठा 40 टक्के, मुस्लिम आणि दलित प्रत्येकी 10 टक्के मतदान आहे. तसेच या मतदारसंघातील मानोरा कारंजा तालुक्यात बंजारा समाजाचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या मतदारसंघामध्ये बंजारा समाजाची काशी आहे,आणि समाजाचं मतदान या मतदारसंघामध्ये जास्त असल्यामुळे समाजातील अनेक नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत

Post Views: 118
Previous Post

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री

Next Post

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला….

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात आला....

ताज्या बातम्या

गौरी पूजनासह महानैवेद्याचा थाट; घराघरांत भक्तिमय वातावरण #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 18, 2026

कंदलगावात दोन घरांवर दरोडा; सहा लाख दहा हजारांचा ऐवज लंपास #viral #news #marathinews #solapurnews

September 18, 2026

गणेशोत्सवात रेल्वे प्रवाशांना फटका #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेसाठी २४० कोटींचा निधी #viral #solapurnews #marathinews

September 18, 2026

पालकमंत्री घेणार सोमवारी पाणीटंचाईचा आढावा #viral #solapurnews #news #marathinews

September 18, 2026

संभाजी ब्रिगेडचा जिल्हा परिषदेत राडा…. #viral #solapurnews #news

September 18, 2026

महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील शिक्के गेले चोरीला नगरसेविका श्रद्धा पवारांनी वेधले लक्ष

September 18, 2026

मोदींना शुभेच्छा देण्यामागे राजकीय हेतू नाही सलगर #viral #solapurnews #news

September 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1231699

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!