तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास उपळे केंद्राचे नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री. दिलीप चंद्रकांत म्हमाणे (एम ए डी एड सीईटी) यांनी प्रशालेस भेट दिली. प्रशालेतील भौतिक सुविधांची पाहणी केली. वर्ग खोल्या, वर्गातील प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, ग्रंथालय, सीसीटीव्ही कॅमेरे, जिमखाना, संगणक कक्ष, शालेय पोषण आहार, सुरक्षा व्यवस्था तसेच परिसर व इतर सुविधा पाहिल्या व समाधान व्यक्त केले. त्यावेळी विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी केंद्रप्रमुख श्री. दिलीप म्हमाणे यांचा फेटा, शाल, बुके व पुस्तके देऊन सत्कार केला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले उपळे दु.चे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर यांचा ही सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक विभागाचे विभाग प्रमुख लंकेश्वर सर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी नवनियुक्त केंद्रप्रमुख म्हमाणे सर यांनी उपशिक्षक म्हणून काम करत असताना स्पर्धा परीक्षा देऊन त्यात यश मिळवले व केंद्रप्रमुख झालो. माझे गाव मळेगाव गाव व आसपासच्या परिसरातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली, असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दत्तात्रेय राऊत यांनी आभार मानले. यावेळी प्रशांत काशीद, अतुल राठोड, अनिल वैद्य, नामदेव महाले,
मकरंद जगदाळे, रेवणसिद्ध दुलंगे, दादासाहेब धनके, सेवक सुरवसे उपस्थित होते.
Post Views: 27