सोलापूर – ब्राह्मण समाजातील विविध संस्था आणि संघटनांतर्फे प्रतिवर्षी श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, श्रावण पौर्णिमा या दोन मुख्य दिवसासह किंवा पंचांगामध्ये ज्या दिवशी श्रावणीचा उल्लेख असेल त्यादिवशी अथवा श्रावण महिन्यातील अन्य सोयीच्या दिवशी वेगवेगळ्या भागात श्रावणीचे अर्थात नवीन यज्ञोपवित (जानवे) धारण करण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याप्रमाणे यावर्षी श्रावणीचे कार्यक्रम विविध ठिकाणी होत आहेत.
यावर्षी २६, २७ आणि २८ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी श्रावणी होणार आहे. या ठिकाणी यज्ञोपवितं परमं पवित्रम् | प्रजापतेर्यत्सहजं पुरस्तात || आयुष्यमग्रयं प्रतिमुञ्च शुभ्रं | यज्ञोपवितं बलमस्तु तेजा: या प्राचीन मंत्राचा जागर या श्रावणीच्या निमित्ताने होणार आहे.
वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या समाज बांधवांना या कार्यक्रमात सहभागी होता यावे, यासाठी शहरातील विविध भागात हा श्रावणीचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आपापल्या जवळच्या ठिकाणी असलेल्या श्रावणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन नवीन यज्ञोपवीत धारण करावे, असे आवाहन ब्राह्मण समाजातील विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. श्रावणीस येताना समाजबांधवांनी पळी, पंचपात्र, तामण, सोवळे, उपरणे, बसण्यासाठी आसन, जानवी जोड घेऊन यावेत. श्रावणीसाठी लागणारे अन्य साहित्य आणि व्यवस्था संयोजकांतर्फै केली जाणार आहे.
विश्वमत्व महा परिषद शाखा सोलापूर या संस्थेच्या वतीने बुधवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी श्रावणी आयोजित करण्यात आली आहे. जुळे सोलापूर ब्रह्म सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी श्रावणी आयोजित करण्यात आली आहे. जुळे सोलापूर परिसरातील सहयोग ब्राह्मण सेवा संघातर्फे शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी श्रावणी आयोजित करण्यात आली आहे.
Post Views: 21