सोलापूर- अधिक मासानिमित्त काशी पिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे अनेक ठिकाणी ईस्टलिंग महापूजा व धर्मसभा संपन्न होत असून त्याचा सांगता समारंभ सोलापुरातील अक्कलकोट रस्त्यावरील श्री बृहन्मठ होटगी संस्था या ठिकाणी होणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त रविवार 14 जून रोजी सायंकाळी 4.00 वा श्री बमलिंगेश्वर बृहन्मठ, विष्णुपंत नगर, अक्कलकोट रोड येथून रंभापुरी उज्जैन व उभय काशी जगद्गुरु यांचा रथोत्सव 1008 जलकुंभ, ग्रंथदिंडी व पारंपारिक वाद्यासह भव्य मिरवणुकीने सुरुवात होऊन अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात महामंगलारतीने सांगता होईल. त्यानंतर बृहन्मठाध्यक्ष चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवाचार्य व भक्तगणांच्या उपस्थितीत धर्मसभा आयोजित करण्यात आले असून त्यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 6.00 वा. महिला मंडळाकडून रुद्रपठणासह काशी जगद्गुरु डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची महापूजा व आशीर्वाद संपन्न होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाची सोय करण्यात आलेलीअसून अधिक मासामध्ये संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात भक्तानी मोठ्या संख्येने सामील होऊन जगद्गुरूंच्या आशीर्वादास पात्र व्हावे असे आवाहन श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
Post Views: 18