बार्शी – जामगाव हद्दीतील अरणगाव रस्त्यावर असलेल्या ‘तुळजाभवानी स्टोन मेटल’ या खडी क्रेशरवरुन अज्ञात चोरट्याने वेगवेगळ्या मशिनच्या एकूण ९५ हजार रुपये किंमतीच्या कॉपर केबल कट करुन चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, अरणगाव (ता. बार्शी) येथील रहिवासी व तुळजाभवानी स्टोन मेटलचे मॅनेजर बाळासाहेब कृष्णा शिंदे (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दि. २९ जुलै रोजी रात्री १ ते सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने क्रेशरच्या आवारात प्रवेश केला. चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी उघड्यावर असलेल्या पाच वेगवेगळ्या खडी क्रेशर मशिनच्या पोलिकॅप कंपनीच्या महागड्या कॉपर (तांब्याच्या) केबल कट करुन चोरुन नेल्या.
चोरीस गेलेला माल- मशिन क्र. १: ५० mm ची २० फूट कॉपर केबल (किंमत १५,००० रु.), मशिन क्र. २: ९५ mm ची २५ फूट कॉपर केबल (किंमत २५,००० रु.), मशिन क्र. ३: ९५ mm ची २५ फूट कॉपर केबल (किंमत २५,००० रु.), मशिन क्र. ४: ५० mm ची २५ फूट कॉपर केबल (किंमत १५,००० रु.), मशिन क्र. ५: ५० mm ची २५ फूट कॉपर केबल (किंमत १५,००० रु.) अशा प्रकारे एकूण ९५,००० रुपये किमतीच्या तांब्याच्या केबल वायर चोरट्याने लांबवल्या आहेत.
ही घटना निदर्शनास आल्यानंतर बाळासाहेब शिंदे यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चौधरी करत आहेत.
Post Views: 9