वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथे कन्नड शाळेत गावातील तरुण युवक कै. सुजय राजेंद्र चनशेट्टी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन देऊन त्या मित्राला अभिवादन करण्यात आला.
स्वर्गीय सुजय हा मित्र नसून प्रत्येक वेळेला धावून येणारा सख्या भावासारखे सर्व मित्रांना वागणूक देणार मित्र होते. चांगल्या मित्राच्या आठवणी म्हणून शालेय साहित्य वाटप करत आहोत असे प्रवीण दुधगी यांनी आपल्या भावना व्यक्त केले.
यावेळी युवराज माळी, बसवराज नवटाके, समर्थ माणकोजी, गणेश गुमदे, भीमाशंकर थळंगे, शिवानंद किणगी, पांडुरंग राठोड या सर्व मित्र उपस्थित होते. कन्नड मुलांची शाळा मुख्याध्यापक संजयकुमार सुतार, कन्नड मुलींची शाळा मुख्याध्यापक लिंगराज गणेर यांनी मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले.