माळशिरस – संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा पूर्ण करून आळंदी कडे निघाला असताना आज माळशिरस येथे या सोहळ्याचे आगमन झाले माळशिरस करांनी या सोहळ्याचे स्वागत केले
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी
सोहळाआळंदीवरून पंढरपूर येथे आषाढी एकादशी च्या सोहळ्यासाठी गेला होता गुरुपौर्णिमेला हा सोहळा विठ्ठलाचे दर्शन घेऊन आळंदी कडे निघाला होता आज सकाळी सात वाजता या सोहळ्याचे माळशिरस मध्ये आगमन झाले माळशिरस ते ग्रामदैवत श्रीराम व श्री हनुमान मंदिरात हा सोहळा दुपारी एक वाजेपर्यंत थांबला होता सकाळी दहा वाजता या सोहळ्यातील आरती व संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पादुकांना नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर दुपारी एक वाजता हा पालखी सोहळा नातेपुते कडे मार्गस्थ झाला आज सकाळी पालखी सोहळा आल्यानंतर माळशिरस सह परिसरातील लोकांनी मारुती मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती
फोटो ओळी
माळशिरस येथून पालखी सोहळा नातेपुते कडे मार्गस्त झाली
Post Views: 5