पंढरपूर – मागील चार महिन्यापासून येथील उपजिल्हा रुग्णालयतील सिटीस्कॅन मशीन
बंद होते, ग्राहक पंचायतीचे सर्व पातळीवरील प्रयत्नाने ते सुरू झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. दरम्यान याबाबत दैनिक सोलापूर तरुण भारतने देखील वारंवार आवाज उठविलेला होता.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने राज्याचे आरोग्य मंत्री,आरोग्य संचालक, तसेच शासनाच्या सर्व पातळीवर पत्रव्यवहार केला, फोनद्वारे संपर्क ठेवला,अनेक सामाजिक संघटनांनीही याबद्दल आंदोलने केली,प्रसिद्धी माध्यमांनीही आवाज उठविला.सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत ग्राहक पंचायतीने सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. सिटीस्कॅन मशीन सुरू झाल्याने भरमसाठ शुल्कातून रुग्णांची सुटका झाली आहे. जनतेसाठी ही सेवा अखंडपणे उपलब्ध ठेवावी
अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीच्या पदाधिकार्याकडून व्यक्त केली जात आहे.
Views: 28