अक्कलकोट – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा स्वामी समर्थांचे निस्सीम सेवक आदरणीय महेश इंगळे यांचे व्यक्तीमत्व म्हणजे स्वामींच्या चरणी समर्पित भावनेने स्वामी सेवा करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे मनोगत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीम देवेंद्रचे कार्यकर्ते गणेश मोहनराव जायभाये यांनी व्यक्त केले.
नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीम देवेंद्रचे कार्यकर्ते गणेश मोहनराव जायभाये यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सदिच्छा भेट दिली श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून इंगळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून यथोचित सत्कार केला. यावेळी गणेश मोहनराव जायभाये बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीम देवेंद्रचे कार्यकर्ते
गणेश मोहनराव जायभाये म्हणाले की
महेश मालक म्हणजे केवळ देवस्थानचे अध्यक्ष नाहीत, तर स्वामी समर्थांच्या प्रत्येक भक्तासाठी सदैव तत्पर असणारे, भक्तांच्या सेवेला प्राधान्य देणारे आणि खरे स्वामी सेवक आहेत. मंदीरात स्वामी भक्तांची सेवा हीच स्वामींची सेवा मानून ते करत असलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी देवस्थानच्या विकासासाठी, स्वामी भक्तांच्या सोयीसाठी आणि अक्कलकोटच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले काम हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. राजकारणापेक्षा समाजकारण आणि भक्तिसेवा याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि स्वामी समर्थांच्या सेवेसाठी
अखंड ऊर्जा लाभो हीच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना असल्याचे मनोगतही जायभाये यांनी व्यक्त केले. यावेळी स्वामी भक्तांसह मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, श्रीकांत मलवे, गिरीश पवार, संजय पवार, ऋषिकेश लोणारी, महेश मस्कले, सागर गोंडाळ उपस्थित होते.
Views: 42