बार्शी – सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गोरगरीब, निराधार आणि वृद्ध व्यक्तींच्या जीवनात आनंदाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठान बार्शी संचलित अन्नपूर्णा योजनेच्यावतीने यंदाही दीपोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. मागील अकरा वर्षांपासून अखंडितपणे सुरु असलेल्या या सेवाभावी उपक्रमांतर्गत यंदा १२० हून अधिक लाभार्थ्यांसोबत दिवाळीचा सण आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
मातृभूमी प्रतिष्ठान ही बार्शीतील अग्रगण्य सामाजिक संस्था असून, अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून मागील अकरा वर्षांपासून शहरातील गोरगरीब, निराधार, वृद्ध आणि गरजू नागरिकांना दररोज दोन वेळचे जेवण मोफत घरपोच दिले जाते. केवळ अन्नदानापुरते मर्यादित न राहता या लाभार्थ्यांनाही सण-उत्सवांचा आनंद घेता यावा, या भावनेतून प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी विशेष दीपोत्सवाचे आयोजन केले जाते.
या उपक्रमात महिला लाभार्थ्यांना साड्या, पुरुष लाभार्थ्यांना शिवून घेतलेले कपडे, तसेच दिवाळीचे फराळाचे पदार्थ भेट म्हणून देण्यात आले. यानंतर सर्व लाभार्थ्यांसोबत गोडधोड भोजनाचा आस्वाद घेत दिवाळी साजरी करण्यात आली. अन्नपूर्णा योजना, पाटील प्लॉट, बार्शी येथे आयोजित या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, मायबोली सांस्कृतिक मंडळाचे सचिव डॉ. प्रशांत मोहिरे, जितूभाई माढेकर, प्रसन्नदाता गणेश मंडळाचे बंडू माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडियाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार सचिव संतोष नाना पाटील आणि शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनीही उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य सहकार सचिव संतोष नाना पाटील यांनी मागील अकरा वर्षांपासून अखंडितपणे आणि अविरतपणे सुरू असलेल्या या सेवाकार्याचे विशेष कौतुक केले. सामाजिक कार्यात सातत्य राखणे हीच संस्थेच्या कार्याची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले.
मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष काका ठोंबरे, सचिव प्रताप अण्णा जगदाळे, खजिनदार मधुकर डोईफोडे, संचालक अशोकजी हेड्डा, प्रा. किरण गाढवे, मुरलीधर चव्हाण, अनिल बंडेवार, डॉ. लक्ष्मीकांत काबरा, शहाजीराजे फुरडेपाटील आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अन्नपूर्णा योजनेचे अध्यक्ष युवराज कादे आणि सचिव अशोक हेड्डा यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष नाईक, अन्नपूर्णा योजनेचे सदस्य रावसाहेब यादव, भगवंत मल्टीस्टेटचे मुख्याधिकारी मिलिंद कांबळे, सागर तिवारी, संकेत वाणी, सुरज कुंभारे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेत
Views: 14