धाराशिव : भाऊबीज हा सण केवळ रक्ताच्या नात्यांचा नसून प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्यांचा उत्सव असल्याचे भावनिक दर्शन धाराशिवमध्ये घडले. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश सतीश इंगळगी यांनी भाऊबीजेचे औचित्य साधून स्वाधार मतिमंद मुलींचे बालगृह, धाराशिव येथे भेट देत तेथील विशेष भगिनींसोबत भाऊबीज साजरी केली.
यावेळी बालगृहातील मुलींनी गणेश इंगळगी यांचे औक्षण करून त्यांना प्रेमाचा आशीर्वाद दिला. या निरागस भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य पाहून इंगळगी भावूक झाले. रक्ताचे नाते नसले तरी प्रेम, माया आणि आपुलकीच्या बळावर निर्माण होणारी नाती अधिक मोलाची असतात, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
सण-उत्सवांचा खरा आनंद समाजातील वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांसोबत आनंद वाटून घेण्यात आहे. या भगिनींच्या पाठीशी एक हक्काचा भाऊ म्हणून सदैव उभे राहण्याचा संकल्प यावेळी गणेश इंगळगी यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या सामाजिक आणि संवेदनशील उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी जपलेल्या या माणुसकीच्या नात्याने उपस्थितांची मने जिंकली.
गणेश सतीश इंगळगी
जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो), धाराशिव.
Views: 9