पंढरपूर – पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धा डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठ, सागर (मध्य प्रदेश) येथे दि. १३ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केलेल्या आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये पुण्याशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा कबड्डी (मुले) संघ सहभागी होणार असून त्या संघामध्ये उमा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेलेला अविनाश राठोड याची निवड झाली असून अविनाशच्या या निवडीबद्दल संथेचे अध्यक्ष तथा मा.आ. प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंद परिचारक, सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अँड. प्रणव परिचारक व इतर संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, संथेचे कार्यवाह डॉ. मिलिंद परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी अभिनंदन केले. अविनाशला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.
Views: 7