सांगोला – महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये आषाढीवारी निमित्त भित्तीपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ.सुरेश भोसले, कवी प्रा.प्रसाद लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुरेश भोसले यांनी या भित्तीपत्रकातून आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व, संत परंपरा, वारकरी संप्रदाय तसेच विठ्ठल भक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक जाणीव विकसित होत असल्याचे सांगून मराठी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी प्रा.प्रसाद लोखंडे यांनी विद्यार्थ्यांनी साहित्य, संस्कृती आणि संतवाङ्मयाचा सातत्याने अभ्यास करावा असे आवाहन केले. यावेळी मराठी विभागाचे प्रमुख प्रा.संतोष लोंढे, अर्थशास्त्रविभाग प्रमुख डॉ.एम.डी.वेदपाठक, प्रा.डॉ.शितल घोंगडे, प्रा.संजय बाबर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.