पंढरपूर – येथील भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा डॉ. प्राजक्ता बेणारे यांची महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार सौ.चित्रा वाघ यांनी नुकतेच डॉ.प्राजक्ता बेणारे यांना नियुक्ती पत्र दिले आहे.
डॉ.प्राजक्ता बेणारे यांनी २०१८ पासून सक्रिय राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीला तत्कालीन भाजप शहराध्यक्ष (कै.) संजय वाईकर यांनी पंढरपूर शहर उपाध्यक्षा या पदावर त्यांची नियुक्ती करुन त्यांना संधी दिली. महिला सक्षमीकरण, एकीकरण, करण्यासाठी त्यांनी शहरात मोठे प्रयत्न केले. अनेक महिला, मुली यांच्यावरील अन्यायाचे निवारण करून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यामुळे अल्पावधीतच जनमानसात त्यांची प्रतिमा उंचावली. गोरगरीब जनता, छोटे विक्रेते, असहाय महिला यांना सर्वतोपरी सहकार्य करून अशा वंचीत आणि शोषीत वर्गाला न्याय मिळवून दिला. सत्ताधारी भाजपा पक्षाच्या विविध लोक कल्याणकारी योजना महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांच्या पर्यंत पोचवून सक्षमतेने त्या राबविल्या.
या बरोबरच शहरातील अनेक निराधार, परीतक्त्या,एकाकी महिला, वृद्ध स्त्रिया यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला, गरज असेल तेव्हा पोलिसापर्यन्त जाऊन न्यायाची परखड भूमिका घेऊन गुंडगिरी किंवा राजकीय दबावाला बळी न पडता सत्याची कास धरून वंचीत घटकास न्याय मिळवून दिला.
दरम्यान डाँ.बेणारे यांच्या याच निर्भीड, बेदरकार,धाडसी नेतृत्वाची वरिष्ठांनी दखल घेऊन त्यांना मोठी जबाबदारी देवून जनतेची सेवा करण्याची संधी दिली.
Post Views: 6