Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 16, 2024
in top news
0
डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत
0
SHARES
67
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चरित्र्याचा हिमालय होते -ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत

नवीन नांदेड प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ यांचे शिष्य आणि त्यांच्या शिस्तीत वाढलेले ‘मोडेल पण वाकणार नाही’ हा नियम पाळणारे डॉ. शंकरराव चव्हाण हे निष्कलंक चारित्र्याचा हिमालय होते. असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘आधुनिक भगीरथ’ चे संपादक डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.
ते दि. १५ जुलै रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्रातर्फे आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानामध्ये “डॉ. शंकररावजी चव्हाण: व्यक्तित्व, नेतृत्व आणि कृतत्व” या विषयावर व्याख्यान देत होते. याप्रसंगी विचार मंचावर त्यांच्या समवेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव पाटील, सन्माननीय उपस्थितीमध्ये मा. व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण, डॉ. सुरेखा भोसले आणि डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ. योगिनी सातारकर यांची उपस्थिती होती.

पुढे डॉ. सावंत म्हणाले की, डॉ. शंकरराव चव्हाण यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे एक क्रांतिकारी कर्तृत्व केले होते. त्याकाळी स्वामी रामानंद तीर्थांनी त्यांना उमरखेड कॅम्पमध्ये काम करण्याची जबाबदारी दिली होती. उमरखेड कॅम्पचे एक मोठे निजामशाही स्थळ उध्वस्त करण्यासाठी दोन हजार क्रांतिकारी तेथे एकत्र जमणार होते. त्यापैकी एक हजार क्रांतिकारी स्थानिकचे होते आणि एक हजार क्रांतिकारी बाहेरून येणार होते. वेळ व दिनांक ठरला पण अचानक मोठ्या पावसामुळे बाहेरून येणारे हजार क्रांतिकारी यांचे नियोजन रद्द झाले. हा निरोप डॉ. शंकरराव चव्हाण यांना देण्यात आला. त्याकाळी त्यांनी जीवाची परवा न करता मोठ्या पूर आलेल्या नदीतून पोहून स्थानिक क्रांतिकारांना हा निरोप दिला. त्यामुळे तेथील हल्ला आणि स्थानिक एक हजार क्रांतीकार्यांचा जीव वाचला. असे कर्तृत्ववान क्रांतिकारी डॉ. शंकरराव चव्हाण होते.

देशाच्या नकाशावर नदी-खोऱ्या धरणाचे नाव येण्यामध्ये डॉ. शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा होता. बारा वर्षे पाटबंधारे खात्याचे मंत्रीपद सांभाळून शेतकऱ्यांना पाणी मिळवून देऊन त्यांचे दारिद्र्य दूर केले. आज जर जायकवाडी आणि विष्णुपुरी धरण मराठवाड्यात नसते तर आपले बेहाल झाले असते. या धरणाचे श्रेय डॉ. शंकरराव चव्हाण यांना जाते. म्हणूनचत्यांना जलपुरुष म्हणून संबोधले जाते.
नांदेड शहर नगरपालिकेच्या अध्यक्षपदापासून ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत सतत ५० वर्षे सक्रिय सार्वजनिक जीवन लोकनियुक्त नेता म्हणून ‘ निष्कलंक नेतृत्व’ केले त्यामुळे डॉ. शंकरराव चव्हाण ताठ मानेने जगले.

याप्रसंगी डॉ. शंकरराव चव्हाण यांचे नातू तथा नांदेड विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य नरेंद्र चव्हाण यांनी आपल्या आजोबाच्या काही आठवणी सांगितल्या ते म्हणाले आमचे आजोबा तथा नाना अतिशय शिस्तप्रिय होते. यावर त्यांनी एक किस्सा सांगितला एकदा डॉ. शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री असताना बीएसएफ च्या विशेष विमानाने नांदेडला येणार होते. ठरलेल्या वेळेप्रमाणे स्वतः शंकरराव चव्हाण आणि नरेंद्र दादा चव्हाण विमानतळावर पोहोचले होते. पण कुसुमताईंना येण्यास वेळ लागत होता. त्यावेळी त्यांनी कुसुमताईंना फोन करून सांगितले आम्ही ठरलेल्या वेळेत निघणार आहोत. तुम्ही रेल्वेने या. सांगायचे तात्पर्य स्वतःच्या पत्नीसाठी त्यांनी शासकीय विमान निघण्यास उशीर होऊ दिला नाही. एवढे शिस्तप्रिय होते.

डॉ. माधव पाटील अध्यक्षीय सामारोपामध्ये म्हणाले डॉ. शंकरराव चव्हाण यांनी एका जिल्ह्याचा किंवा विभागाचा नव्हे तर पूर्ण देशाचा कायापालट होईल असे निर्णय त्यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतले होते. आम्हाला अभिमान आहे आम्ही त्यांचे गुरुवर्य असलेले स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नावाने असलेल्या विद्यापीठांमध्ये शैक्षणिक योगदान देत आहोत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयिका डॉ. योगिनी सातारकर यांनी केले तर आभार प्रदर्शन या केंद्राच्या सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. मलिकार्जुन करजगी यांनी केले.

Post Views: 49
Previous Post

आषाढीनिमित्त विठ्ठला च्या देखाव्याचे हुबेहूब सादरीकरण केले

Next Post

उमरी येथील कन्याशाळा बंद केल्यास आंदोलन करणार – नगरसेवक साईनाथ जमदाडे .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
उमरी येथील कन्याशाळा बंद केल्यास आंदोलन करणार – नगरसेवक साईनाथ जमदाडे .

उमरी येथील कन्याशाळा बंद केल्यास आंदोलन करणार - नगरसेवक साईनाथ जमदाडे .

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0885831

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697