पंढरपूर – येथील श्री संत प्रल्हाद महाराज बडवे मंदिर या ठिकाणी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांचा रविवारी (ता.१३) वाढदिवस साजरा करण्यात आल्याची माहिती तिर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी (इंचगावकर ) यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले की, रामसेतू रक्षक तथा हिंदू संस्कृती हेरिटेज रक्षक डॉक्टर स्वामी यांचा वाढदिवस श्री विठ्ठल मूर्तीचे संरक्षक श्री संत प्रल्हाद महाराज बडवे यांच्या मंदिरात त्यांच्या समाधीचे पूजन करण्याचे औचित्य साधून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्री शंकराचार्य मठ संचलित पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी वेदपाठ शाळा मधील विद्यार्थ्यांनी वेदमंत्र घोष पठण केले. यानिमित्त वारकरी भाविकांना मिष्टान्न वाटप करण्यात आले.
श्री राम सेतूचे रक्षण केल्याप्रमाणेच डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरच्या विध्वंसक कॉरिडॉर पासून पौराणिक वास्तू घरेद्वारे मठ मंदिरे निश्चित वाचवतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी बचाव समितीचे अध्यक्ष श्री अभयसिंह कुलकर्णी इचगावकर, उपाध्यक्ष माऊली महाराज गुरव, जेष्ठ कीर्तनकार वारकरी संघाचे हरिभक्तिपरायण रामकृष्ण वीर महाराज, व्यंकटेश गलगलकर, वैभव बडवे, अनिल गवळी, यशवंत बेणारे, वैभव रणदिवे, महेश राजहंस, महेश काळे,गणेशबापू उंडाळे ह. भ. प. राधा गिरीधारी दास, आयोजक तथा बडवे समाजाचे ज्येष्ठ गोपाळराव बडवे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
—————
चौकट : ( देव,देश धर्माच्या कार्यासाठी दीर्घायुष्य प्राप्त होवो )
डॉक्टर स्वामी यांनी भाविक हितविरोधी पंढरपूर काँरिडोरचा प्रश्न उचलून धरलेला आहे. या बरोबरच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे मूळ मानकरी बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांचाही प्रश्न उचलून धरला आहे. या दोन्ही प्रश्नांमध्ये त्यांना यश मिळावे आणि त्यांना देव, देश धर्माच्या कार्यासाठी उज्वल दीर्घायुष्य प्राप्त व्हावे असे आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात आल्या.
Post Views: 6