सांगोला – जि.प.प्रा.केंद्र शाळा, मेडशिंगी (ता.सांगोला) येथील इ.७ वीच्या १९६६ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा त्याच शाळेत सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी यांनी आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नारायण विसापूरे, प्रमुख पाहुणे प्रा.भीमाशंकर पैलवान, शंकरराव डोंबे, प्रा.राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन व खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने झाली. या प्रसंगी टीईटी परीक्षेत यश संपादन करून शिक्षक म्हणून निवड झालेल्या संगीता कसबे, गौरी माने, भारती नष्टे आणि डॉ.अनिकेत माने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगतात प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्रा.भीमाशंकर पैलवान, प्रा.नारायण विसापूरे, एम.बी.इंगोले सर आणि वाकीचे सरपंच देवकते यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत सर्वांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नष्टे यांनी केले. या स्नेहमेळाव्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते.