श्रीपूर – येथिल कमयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या स्टॅटेस्टीकल डेटाबेस ( सांख्यिकीय ) समितीवर तज्ञ रुदस्य म्हणून करण्यात आली आहे .
डॉ . यशवंत कुलकर्णी यांच्या निवडी मुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
साखर उद्योगाशी सल्लग्न असलेल्या विविध विभाग, संस्थांचा गुणात्मक अभ्यास करून संभाव्य ध्येय धोरण ठरवणे हा उद्देश या समितीचा असणार आहे .
राज्याचे साखर आयुक्त डॉ . संजय कोलते यांच्या अध्यक्षते खाली ही समिती काम करणार आहे .
यामध्ये प्रामुख्याने राज्यातील गायकवाड खाली असणारे साखर कारखाने , बंद साखर कारखाने , भागीदारी भाडे,सहयोग तत्वावर चालणारे , अवसायनातील, नोंदणी रद्द झालेले , गाळप परवाना वितरण , मुख्यमंत्री सहायता निधी संकलन , कारखान्यात गाळप झालेला ऊस , अदा करायचा अंतिम दर , उत्पादित होणारे उपपदार्थ, साखर साठा, वैधानिक लेखापरीक्षण, गळपा करिता उपलब्ध उसाचा अंदाज, दैनंदिन गाळप, साखर उतारा, साखर उतारा घट माहितीचे संकलन, साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल, साखर उद्योगाकडून राज्य व केंद्र सरकारला दिले जाणारे कर, उद्योगाचा चालू संकलित संचित नाफा तोटा , अंतिम तोडणी वाहतूक खर्च , हवाई अंतर, राज्य केंद्र सरकारचे पुरस्कार, अर्थ सहाय्य योजना, ऊस तोडणी कामगार, साखर कारखान्यातील कर्मचारी, अर्थव्यवस्थेतील कृषी व इतर क्षेत्रातून उत्पन्नाचे जिल्हा व राज्यस्तरीय अंदाज, केंद्र व राज्य शासन साखर उद्योगातील संशोधन, संस्था व साखर आयुक्त स्तरावरील निर्णय, अशा साखर उद्योगाशी सल्लग्न असणार्या विभागांची ही समिती सखोल अभ्यास करून साखर उद्योगाच्या मजबूती साठी व भविष्यातील समस्यांचे निराकरण व यावर उपाय योजना यावर काम करणार असल्याने या समितीस विशेष महत्व प्राप्त झाले आहे .
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .. . . .
…डॉ . कुलकर्णी यांचे उत्तम कामाची दखल . .
डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक तसेच विद्यमान चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे नेतृत्वा खाली पांडुरंग कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची धुरा हाती घेतली . आपल्या उण्या पुर्या १२ वर्षाच्या काळात त्यानी अनेक उत्तम निर्णय घेत कारखान्याची प्रगती करत राज्य व देश पातळीवरील अनेक मान्यता प्राप्त पुरस्कार मिळवले . बेस्ट एम . डी . म्हणून व्हीएसआय चा सर्वोच्च पुरस्कार, महारष्ट्र राज्य एम . डी असोशिएशनचे उपाध्यक्ष म्हणून कारकीर्द व आता तज्ञ सदस्य म्हणून निवड ही त्यांच्या यशस्वी कामाची पावतीच म्हणावी लागेल .