सांगोला – सध्या तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा मिळवताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे येणाऱ्या वर्षात गोरगरीब, गरजू रुग्णांसह सर्व नागरिकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत किंवा अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे आवाहन आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी केले. ते धन्वंतरी जयंती व धनत्रयोदशीचे औचित्य साधून आ.डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टी आणि रोटरी क्लब ऑफ, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉक्टरांचा सन्मान सोहळा कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने आणि स्तवनाने झाली. यावेळी शहरातील स्व.डॉ.श्रीकांत भोसेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी डॉ.निकिता देशमुख, रोटरी क्लबचे माणिक भोसले, अनिल इंगवले, अरुण पाटील तसेच रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे व आ.डॉ.बाबासाहेब देशमुख मेडिकल फॅकल्टीचे सदस्य उपस्थित होते.
चौकट-
या डॉक्टरांचा झाला सन्मान
डॉ.प्रभाकर माळी, डॉ.मच्छिंद्र सोनलकर, डॉ.अमरसिंह शेंडे, डॉ.विजय बंडगर, डॉ.निरंजन केदार, डॉ.अनिल कांबळे, डॉ.शिवराज भोसले, डॉ.रणजीत केळकर, डॉ.महेश राऊत, डॉ.संतोष पिसे, डॉ.एच.व्ही.गावडे, डॉ.दत्तात्रय इंगोले, डॉ.ढाळे, डॉ.प्रशांत देशमुख, डॉ.राजाराम लवटे, डॉ.बसवेश्वर पाटील, डॉ.कोमल कांबळे, डॉ.विनायक डमकले, डॉ.उषा देशमुख, डॉ.अभयसिंह देशमुख, डॉ.फिरोज तांबोळी, डॉ.अभिजीत सोनलकर, डॉ.शैलेश डोंबे, डॉ.प्रमोद बोराडे, डॉ.सचिन गवळी, डॉ.विजय इंगवले, डॉ.प्रवीण पैलवान, डॉ.अजित नवले, महादेव कोळेकर,
डॉ.विवेकानंद विभुते, डॉ.सारिका लवटे, डॉ.सुनील लवटे, डॉ.प्रज्ञा लवटे, डॉ.अमर जाधव, डॉ.किरण जगताप, डॉ.सैफुल तांबोळी, डॉ.विनोद केदार, डॉ.सुपर्णा केळकर, डॉ.मुल्ला, डॉ.शिंगण, डॉ.धनंजय गावडे, डॉ.महावीर आलदर, डॉ.पटेल