Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनोरमा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोरे यांची निवड 

तरुण भारतbyतरुण भारत
December 7, 2025
in solapur
0
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात दि.  25 डिसेंबर रोजी होणाऱ्या एकदिवसीय मनोरमा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांची आज एकमताने निवड करण्यात आली.

         कोटणीस नगर येथील मनोरमा कॉन्फरन्स सभागृहात डिजिटल मीडिया संपादक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सभेत एकमताने ही निवड करण्यात आली.  यावेळी मनोरमा साहित्य पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्रा. राजशेखर शिंदे, मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा शोभा मोरे, मनोरमा साहित्य मंडळीच्या महिला उपाध्यक्षा अस्मिता गायकवाड, निवड समितीच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. कविता मुरूमकर, मसापचे जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, कवी मारुती कटकधोंड, गझलकार बदिउज्जमा बिराजदार, राजेंद्र भोसले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, न्यूज प्लसचे तात्यासाहेब पवार, उमाकांत चौंडे, विजय कालेकर, सोलापूर आकाशवाणीचे निवृत्त निवेदक अभिराम सराफ, कोषाध्यक्ष शिल्पा कुलकर्णी, कविता कुलकर्णी,  नीलकंठ करंडे, पुरुषोत्तम साखरे, सुनील पाटील, संध्या हेब्बाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदासाठी मोरे यांच्या नावाची  सूचना ज्येष्ठ कवी मारुती कटकधोंड यांनी मांडली तर गोविंद काळे यांनी त्यांना अनुमोदन दिले. याप्रसंगी राजेंद्र भोसले, कविता मुरुमकर, अभिराम सराफ, तात्यासाहेब पवार, किरण बनसोडे आदी मान्यवरांची अभिनंदन आणि शुभेच्छापर भाषणे झाले.      

         संमेलनाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे म्हणाले, “मराठी भाषेची जननी संस्कृत आहे. तिचा प्रचंड मोठा विस्तार झाला असून ती भाषा आपण जपली पाहिजे. मराठी भाषेला नैतिकतेचे अधिष्ठान आहे. आजपर्यंत गेल्या 26 वर्षात मनोरमा परिवाराने साहित्य क्षेत्रातील 250 जणांना सन्मानित केले आहे. ही चळवळ पुढेही चालूच राहील. मराठी साहित्य आज कुठे आहे. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भावार्थदीपिका आली आहे. संत साहित्याचा गाभा यामध्ये आपणास सापडतो. मराठी भाषेचे संवर्धन आणि जागर झाला पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने संमेलन यशस्वीरित्या पार पाडू ,अशी ग्वाही देतो.”

        यावेळी शोभा मोरे, अस्मिता गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.  प्रारंभी सभेचे अध्यक्ष राजा माने यांचा सत्कार श्रीकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. तर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्रीकांत मोरे यांचा सत्कार राजा माने यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. राजशेखर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पद्माकर कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदीही मोरे यांची निवड व्हावी : माने 

यावेळी राजा माने म्हणाले, श्रीकांत मोरे यांची अखंड साहित्य सेवा चालू आहे. गेल्या 26 वर्षाची ही चळवळ असून यामध्ये मोरे यांचे अमूल्य योगदान आहे. त्याचे साहित्य मुक्तछंदामध्ये आहे. कथा, कविता, ललित लेखन या सर्व प्रकारात त्यांचे नैपुण्य आणि गुणवत्ता आहे. कुठलीही अपेक्षा न ठेवणारा हा माणूस बँकेचे कामकाज सांभाळून मराठी साहित्य क्षेत्रात सेवा करत आहे. त्यामध्ये त्यांनी कुठेही खंड पडू दिला नाही. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड व्हावी अशी योग्यता त्यांच्याजवळ आहे, अशी भावना राजा माने यांनी व्यक्त केली. 

सर्वांच्या सहकार्यातून सुसूत्र पद्धतीने संमेलन यशस्वी होईल : श्रीकांत मोरे

सोलापूर हे तीर्थक्षेत्र आहे. त्याला ऐतिहासिक, भौगौलिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरचे योगदान मोठे आहे. सोलापूरला साहित्य क्षेत्रात मोठा वारसा लाभला आहे. डिजिटल युगातही अनेक लोक पुस्तके वाचतात. मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे या मुख्य उद्देशातून सोलापुरात होणारे हे संमेलन सर्वांना घेऊन यशस्वी करूया.

नेटके नियोजन आणि सुसूत्र पद्धतीने हे संमेलन होईल, असा विश्वास नूतन अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

Post Views: 97
Previous Post

गुळाचा गोडवा वाढला; बाजार समितीत गुळाचे दर ४ हजारावर 

Next Post

शेतकऱ्यांना MREGS योजनांचा त्वरित वैयक्तीक लाभ मिळावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शेतकऱ्यांना MREGS योजनांचा त्वरित वैयक्तीक लाभ मिळावा

ताज्या बातम्या

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

राऊताना माण मधून आला आहेर #viral #news #marathinews

August 4, 2026

माजी राज्यपाल व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन #marathinews

August 4, 2026

नगर अभियंता अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा #solapurnews

August 4, 2026

पहा धडकी भरणारा प्रसंग #viral

August 4, 2026

आता सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही #viral

August 4, 2026

पुण्यात बाईक रायडर्सची पोलिसांनी जिरवली #viral#cmomaharashtra #marathinews

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1026908

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!