Saturday, October 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईतील स्मशानभूमीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा वापरात येणार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 24, 2024
in maharashtra
0
मुंबईतील स्मशानभूमीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा वापरात येणार
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 24 जून (हिं.स.) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व विभागांमध्ये स्मशानभूमीच्या अंत्यविधीची सुविधा देण्यात येते. स्मशानभूमीच्या ठिकाणी मृतदेहाच्या दहनासाठी पर्यावरणपूक लाकडी दहन यंत्रणे (Eco – Friendly Pyre creation system technology) चा वापर करण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि पूर्व – पश्चिम उपनगरात ९ ठिकाणी हे तंत्रज्ञान बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत वापरण्यात येणार आहे. पर्यावरणाचा ऱहास टाळतानाच वायु प्रदूषण टाळण्यासाठी या पद्धतीचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

वायू प्रदुषणाची पातळी कमी करण्यासाठीचे पाऊल म्हणून पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर संपूर्ण मुंबई महानगरामध्ये करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉक्टर (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात असे मिळून नऊ ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. विद्युत दाहिनी आणि गॅसदाहिनीच्या सोबतच आता पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर हा प्रदुषण कमी करण्यासाठीच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.

मुंबई शहरात भोईवाडा स्मशानभूमी, गोवारी स्मशानभूमी (वडाळा), वैंकुठधाम स्मशानभूमी (रे रोड) तसेच पूर्व उपनगरामध्ये टागोर नगर स्मशानभूमी (विक्रोळी), देवनार कॉलनी स्मशानभूमी (गोवंडी), अमरधाम पोस्टल कॉलनी (चेंबूर) आणि पश्चिम उपनगरामध्ये बाभाई स्मशानभूमी (बोरिवली), ओशिवरा स्मशानभूमी, शिवधाम स्मशानभूमी (गोरेगाव) आदी नऊ ठिकाणी स्मशानभूमीत पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.

सध्या मुंबईतील विविध स्मशानभूमीच्या ठिकाणी लाकडी चिता, विद्युत दाहिनी आणि गॅस शवदाहिनीचा वापर मृतदेहाच्या दहनासाठी करण्यात येतो. सद्यस्थितीत १० स्मशानभूमींमध्ये विद्युत दाहिनी आणि १८ स्मशानभूमीच्या ठिकाणी गॅस शवदाहिनी बसविली आहे. आता ९ लाकडी दाहिनीच्या ठिकाणी पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. याआधी २०२० साली शीव येथील स्मशानभूमीत लाकडी दहन यंत्रणेचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यानंतर नऊ ठिकाणी ही पद्धती अंमलात आणण्यासाठीची निविदा प्रक्रिया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागामार्फत सुरू आहे.

मृतदेहाच्या दहनासाठी लाकडाएवजी पर्यायी इंधन म्हणून ब्रिकेट्स / पॅलेट्स बायोमासचा वापर करण्यासाठी १४ स्मशानभूमी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱहास टाळतानाच वायु प्रदुषण टाळण्यासाठीही मदत होत आहे.

पर्यावरणपूरक लाकडी दहन यंत्रणा

मृतदेहाच्या दहनासाठी कम्बशन चेंबरचा वापर करण्यात येतो. तसेच दाहिनीच्या भट्टीच्या विशिष्ट रचने मुळे कमीत कमी लाकडांचा वापर हा दहनाच्या प्रक्रियेत होतो. परिणामी प्रदुषणात घट करण्यासाठी मदत होते. प्रत्येत मृतदेहाच्या दहनासाठी लागणाऱया ३५० किलो ते ४०० किलो लाकडांच्या तुलनेत १०० ते १२५ किलो इतक्या लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे सरासरी २५० किलो इतक्या लाकडाची बचत प्रत्येक दहनाच्या प्रक्रियेत होणार आहे. परिणामी कार्बन उर्त्सजनाचे प्रमाणही कमी होण्यासाठी यंत्रणा उपयुक्त आहे. पर्यावरणपूरक आणि वैज्ञानिक पद्धतीवर आधारित अशी अद्ययावत स्वरूपाची लाकडी दहन यंत्रणा जरी तयार करण्यात आलेली असली, तरीही धार्मिक विधींसाठीचा विचारही या संरचनेत करण्यात आला आहे. ट्रॉलीच्या बाहेरील बाजुच्या सुविधेमुळे अतिशय सोप्या पद्धतीने धार्मिक विधी करणे शक्य आहे.

ऊर्जा वहनासाठी तसेच कमीत कमी धूर पर्यावरणात चिमणीतून जाईल अशा पद्धतीची रचना दहन यंत्रणेसाठी करण्यात आली आहे. विशिष्ट व्यवस्थेमुळे कमीत कमी धूर निर्माण होतो. वॉटर स्क्रबर आणि सायक्लोनिक सेपरेटरमध्ये वायू प्रदूषकांमधील कण व विषारी वायू काढून टाकले जातात. या प्रक्रियेनंतर निर्माण झालेली हवा ३० मीटर उंच चिमणी मधून हवेत सोडली जाते. मुंबईतील ९ ठिकाणी या यंत्रणेच्या अंमलबजावणीनंतर सध्याचे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

Post Views: 153
Previous Post

मुंबई : रस्ते सिमेंट कॉंक्रिटीकरण प्रकल्पाच्या गुणवत्ता वाढीसाठी विचारमंथन कार्यशाळेत उमटला सूर

Next Post

भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

ताज्या बातम्या

पदस्थापनेचा निर्णय संबंधित विभागप्रमुख व मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा !

October 9, 2026

चनबसप्पा खेडगी यांच्या सारखे विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे

October 9, 2026

सकाळी उठल्यावर आई-वडिलांचा पाया पडून आशीर्वाद घ्या

October 9, 2026
जागतिक टपाल दिवस साजरा

जागतिक टपाल दिवस साजरा

October 9, 2026

नेहरू वसतिगृहाचे स्ट्रक्चरल ऑडिटचे बट्ट्याबोळ !

October 9, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

धाराशिव जिल्हा परिषदेत महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय!

October 9, 2026
वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

वृत्तपत्र विक्रेत्यांचा एल्गार! कल्याणकारी महामंडळाच्या अंमलबजावणीसाठी बार्शीत तहसीलदारांना निवेदन

October 9, 2026
ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी शाळा व वसतिगृहे सुरू करा

October 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1328605

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!