सोलापूर – वृत्तपत्र लेखक मंचच्या अध्यक्षपदी फैय्याज शेख यांची, तर कार्यवाह पदी अरुण धुमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रलेखक अशोक खानापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा पदाधिकाऱ्यांची, पुढील एक वर्षासाठी एकमताने निवड करण्यात आली. लेखक मंचचे इतर पदाधिकारी:-
मयुरेश कुलकर्णी (उपाध्यक्ष), प्रा. धनंजय शहा(सहकार्यवाह), रामकृष्ण आघोर (कार्याध्यक्ष), प्रा. अशोक म्हमाणे (कोषाध्यक्ष) कार्यकारिणी सदस्य:- श्रीवल्लभ करकमकर, अशोक खानापुरे,सुनील पुजारी, प्रेमचंद मेने,विठ्ठल वठारे, मल्लिनाथ किणगी, डॉ.रामचंद्र धर्मसाले, . रंगसिध्द कोरे, प्रसिद्धी प्रा.गणेश लेंगरे, प्राजली मोहीकर, वरील सर्वांचे, प्रा.डाॅ. श्रीकांत येळेगावकर, अरविंद जोशी,पद्माकर कुलकर्णी आणि अवधूत म्हमाणे यांनी अभिनंदन केले.






















